Niphad stray dog Protest : मुख्याधिकारी दालनात कुत्रे सोडणं पडलं महागात, ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखासह पाच जणांवर गुन्हा दाखल

Stray Dogs Released in Niphad Nagar Panchayat Office : मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात घुसून त्यांच्या टेबलवर कुत्रे सोडणे शिवसेना ठाकरे गटाचे युवा जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल.
Case Filed Against Five People in Niphad
Stray Dogs Released in Niphad Nagar Panchayat OfficeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक जिल्ह्यातील निफाड नगर पंचायतीमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातील टेबलवर कुत्रे सोडणे शिवसेना ठाकरे गटाचे युवा जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, नगरसेविका रूपाली रंधवे यांना चांगलेच महागात पडले असून रंधवे दाम्पत्यांसह पाच जणांविरुद्ध निफाड पोलिसांत मुख्याधिकारी धीरज भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.

शहरातील मोकाट श्‍वानांच्या वाढत्या त्रासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या निषेधार्थ बुधवारी (दि.१६) युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांनी निफाड नगर पंचायतीत थेट मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या टेबलवर चक्क चार ते पाच मोकाट कुत्रे सोडून निषेध नोंदवला. पोत्यात आणलेली कुत्र्यांची पिले त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर सोडली.

निफाड शहरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुले, वृद्ध आणि वाहनचालकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. या त्रासाबाबत वारंवार निवेदने व तक्रारी देऊनही प्रशासनाकडून नसबंदी मोहीम किंवा श्‍वान पकडण्याची कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांनी आक्रमक होत थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालतान घुसून टेबलवर कुत्री सोडत प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलला नोटांचा हार घालून निषेध नोंदवला.

Case Filed Against Five People in Niphad
Niphad stray dogs : निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पेटला; ठाकरेंचा शिलेदार भलताच आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच कुत्रे सोडले

गणेशोत्सव सुरू असताना नागरिकांना गणेश मंडळांपर्यंत जाणे कठीण झाले आहे. श्‍वानांच्या दहशतीमुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत. असे असतानाही नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करून केवळ टेंडरच्या कामांमध्ये रस दाखवला जात असल्याचा थेट आरोप विक्रम रंधवे यांनी मुख्याधिकाऱ्यांवर केला. प्रशासनाने या आंदोलनानंतरही दखल घेतली नाही तर पुन्हा एकदा नागरिकांच्या उपस्थितीत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडण्यात येतील, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

Case Filed Against Five People in Niphad
Maharashtra Fake Godmen Baba : अशोक खरातच्या कारनाम्यांचे सहा महिने अन् भोंदूबाबांच्या अटकेची शंभरी, पुरोगामी महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी गोष्ट

मात्र, आता याप्रकरणी रंधवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गैर कायद्याची मंडळी जमा करून जमाव बंदी कायद्याचे उल्लंघन करणे, कुत्र्यांना अमानूष वागणूक देणे, अरेरावी, धक्काबुकी तसेच दमदाटी करून सरकारी कामात आणणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जनहिताचे काम करतानाही रंधवे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com