Nashik NMC standing committee meeting controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik NMC Politics: टक्केवारीचा आरोप सत्ताधारी नगरसेवकांना झोंबला; स्थायी समितीच्या बैठकीत प्रसाद!

Nashik corporators clash in standing committee meeting: महापालिकेच्या कंत्राटदाराने नगरसेवकांबाबत गंभीर आरोप केला होता.

Sampat Devgire

Nashik civic politics: महापालिका आणि सरकारी कामांमध्ये टक्केवारीचा आरोप नवा नाही. राजकीय कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना त्यातील वास्तव ज्ञात आहे. याबाबत सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असतात.

पंचवटी परिसरात सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. काम सुरू असताना कंत्राटदारांना नगरसेवकांनी धमकावले. नगरसेवकांच्या समर्थकांकडून कामाबाबत त्रास दिला जात होता.

या संदर्भात संबंधित कंत्राटदार आणि लिखित स्वरूपात महापालिका प्रकल्प अभियंत्यांना पत्र दिले होते. संबंधित अभियंत्यांनी त्याची गंभीर दखल घेतली होती. यासंदर्भात त्यांनी काही कंत्राटदारांकडे माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.

महापालिका स्थायी समितीची बैठक गुरुवारी सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी कंत्राटदाराच्या तक्रारीबाबत विचारणा केली. माध्यमांत बातमी आल्याने सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

नगरसेवकांबाबत अशाप्रकारे तक्रारी आल्याने लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेला बाधा येते. नागरिकांमध्ये नगरसेवकांविषयी उलटसुलट चर्चा होते. हा लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचा भाग तर नाही ना?, अशी विचारणा शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पक्षाच्या सदस्याने केली.

याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. तक्रारीबाबत चौकशी करण्यात यावी. यातील सत्य आणि दोषी नगरसेवक कोण हे कळले पाहिजे. अन्यथा सगळ्याच नगरसेवकांकडे बोट केले जाईल, या शब्दात संबंधित नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, सत्ताधारी पक्षाशी संबंधित आणि पदाधिकारी असलेल्या या बाहुबली नगरसेवकाबाबत तक्रार आल्याने तो चर्चेचा विषय होता. विरोधकांनीही याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सत्ताधारी पक्ष सावध झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT