Kolhapur Mahapalika: 2002 मध्ये निलंबित, 25 वर्षांपासून 1 लाख 60 हजार महिना 'फुकट'चा पगार; 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बाजार उठणार

Kolhapur MahanagarPalika News: निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांवर लाखो रुपयांची बरसात सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणल्यानंतर महापौर रूपारानी निकम यांनी थेट महापलिका अधिकाऱ्यांना जाब विचारला.
Kolhapur Mahapalika .jpg
Kolhapur Mahapalika .jpgSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर महानगरपालिकेला आर्थिक संकटाच्या झळा बसत आहेत. अशातच सोमवारी झालेल्या महासभेत नगरसेवकांनी आर्थिक संकटात नेणाऱ्या महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा केला. प्रकरण बाहेर आल्यानंतर महापालिकेतील सर्वच नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एक-एक कारण बाहेर काढत भांडाफोड केला. निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांवर लाखो रुपयांची बरसात सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणल्यानंतर महापौर रूपारानी निकम यांनी थेट महापलिका अधिकाऱ्यांना जाब विचारला.

2002 मध्ये निलंबित केलेल्या अभियंता चंद्रकांत केंबळे 25 वर्षे घरात बसून आहेत. त्यांना महापालिकेकडून दरमहा एक लाख 60 हजार इतका पगार दिला जातो. अशी एक-दोन नव्हे, तर 15 अधिकारी, कर्मचारी आहेत, असे नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी सांगत गौफ्यस्फ़ोट केला.

सध्या महापालिकेकडे माणसे नाहीत म्हणायचे आणि अशांना बसून पगार द्यायचा का? निलंबित कर्मचाऱ्यांवर किती खर्च होतो? हे प्रशासन पाहते की नाही. आढाव समितीत काय होते? महापालिकेत सारा भोंगळ कारभार सुरू आहे.

कित्येक वर्षांपासून निलंबित असलेल्यांना स्मशानभूमीच्या (मडीगेट), पाणीपुरवठ्याच्या कामावर घ्या. काळम्मावाडी धरणावर बसवा. त्यांच्या चौकशीत चालढकल करण्याचे रॅकेट आहे, असे वाभाडे प्रा. पाटील यांनी काढले.

Kolhapur Mahapalika .jpg
Ashok Kharat Case: खरातच्या व्हायरल अश्लील व्हिडिओमुळे बदनामी...; पीडितेच्या कुटुंबीयांसमोर नवं संकट, केली 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी

आर्थिक संकटाचा वाद हा इतक्यावरच न थांबता अन्य नगरसेवकांनी देखील याबाबतची कारणे स्पष्ट केली. 2024-25 मध्ये घरफाळ्याची जमा १०५कोटी ६९ लाख दाखवली. दरवर्षी बारा टक्के वाढीने वाढीव आकडा यायला हवा होता.

यंदा तो आकडा 105 कोटी 66 लाख असा कमी कसा झाला? नियंत्रण अधिकाऱ्यांना त्याची माहिती आहे का? अशी विचारणा प्रा. जयंत पाटील केली. त्यावर सर्वच अधिकारी निरुत्तर झाले. सुनील मोदी यांनी शंभर कोटींवर तूट येत आहे. त्याच्या वसुलीसाठी काही प्रयत्न केले जात नाहीत असे दिसते.

Kolhapur Mahapalika .jpg
Ashok Kharat Solapur Connection : अशोक खरातचं सोलापूर कनेक्शन उघड; माजी आमदाराकडून खरातच्या मुलीला 32 लाखांचा फ्लॅट भेट

केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या पक्षांचीच महापालिकेत सत्ता आहे. त्यांच्याकडून काही योजना मिळविण्याची गरज आहे. महापालिकेचा हिस्सा भरण्यासाठी कर्ज काढण्याला विरोध आहे. स्वतः काही उत्पन्न वाढीचा विचार करा, असे सांगितले.

आदिल फरास यांनी शेवटच्या टप्प्यात वसुलीसाठी धावपळ करण्यापेक्षा नियोजन करावे, असे सांगितले. इंद्रजित बोंद्रे यांनी ऐच्छिक निधीसाठी सत्ताधारी व विरोधक असा भेदाभेद केल्याबद्दल निषेध केला. ही पद्धत अवलंबणार असाल तर आम्ही सभागृहातून बाहेर जातो, असा इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com