

Pune News : महापालिकेच्या परिसरात पिस्तूल घेऊन येणाऱ्या नगरसेवकांवर आता थेट अपात्रतेची कारवाई होणार असल्याचा कडक इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे. त्यामुळे महापालिकेत शस्त्र घेऊन वावरणाऱ्यांवर आता लगाम बसणार आहे. त्यामुळे आता महापालिकेत पिस्तूल घेऊन येणाऱ्या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत.
चार वर्षांनंतर महापालिका निवडणुका पार पडल्याने सध्या महापालिकेत नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. अशातच काही नगरसेवक आणि कार्यकर्ते परवानाधारक पिस्तूल घेऊन येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अलीकडेच एका नगरसेवकाने मुख्यसभेला जाताना पिस्तूल घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती.
या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने महापौरांच्या संरक्षणासाठी डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. त्यानंतर प्रशासन आणखी सतर्क झाले असून आयुक्तांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, परवानाधारक पिस्तूल असले तरी महापालिकेत ते आणण्यास मनाई आहे.
“ येत्या काळात जर कोणताही नगरसेवक पिस्तूल घेऊन महापालिकेत आला, तर त्याच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल,” असे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे आता महापालिकेत पिस्तूल घेऊन येणाऱ्या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत.
नवीन समाविष्ट झालेल्या गावांमधून यंदा मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आले आहेत. या समाविष्ट गावातील बहुतांश नगरसेवकांकडे परवानाधारक पिस्तूल आहे. हे नगरसेवक महापालिकेमध्ये येताना पिस्तुल आपल्या कमरेला लावून फिरताना पाहायला मिळतात. एकीकडे स्वताच्या संरक्षणासाठी हे पिस्तूल नगरसेवक बाळगत असले तरी दुसरीकडे महापालिकेत येणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी हा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने हा निर्णय घेतला असल्याचा सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.