Malegaon controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon controversy : 'नमाज पठण'ला 'हनुमान चालिसा'नं उत्तर देणं भोवलं; मालेगावमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Malegaon Namaz Row: Case Filed Against Hindutva Activists : नमाज पठण करणाऱ्यांचा निषेधासाठी मालेगाव महापालिकेत हनुमान चालिसा म्हणणाऱ्या, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pradeep Pendhare

Nashik political news : मालेगाव महापालिकेतील उपमहापौर शान-ए-हिंद यांनी कार्यकर्त्यांनी दिलेला टिपू सुलतानचा फोटो दालनात लावल्यावरून राज्यभरात वाद उफाळला होता. यातच मालेगाव महापालिकेच्या विद्युत अधीक्षकांच्या दालनात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समोर आले.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी यावर जोरदार आक्षेप घेत फौजदारी कारवाईची मागणी केली. अशी कारवाई झाल्यानंतर नमाज पठणाचा निषेधासाठी मालेगाव महापालिका आयुक्तांच्या दालनात हनुमान चालिसा म्हणणाऱ्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

मालेगाव (Malegaon) महापालिकेतील नमाज पठण केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केल्यानंतर देखील हे प्रकरण थांबायला तयार नाही. नमाज पठण केल्याच्या निषेधार्थ मालेगाव महापालिका आयुक्त कार्यालयात हनुमान चालिसा म्हणण्यात आले. परंतु हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना ही हनुमान चालिसा म्हणणे भावले आहे.

मालेगाव महापालिका आयुक्तांच्या दालनात हनुमान चालिका म्हणणाऱ्या हिंदुत्वावादी (Hindutva) कार्यकर्ते श्याम देवरे, मयुर जैन यांच्यासह 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगावच्या किल्ला पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिस अधिनियम कलम 135, 37(1), 37(3), BNS 189(2),190, 224 नुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागात 25 फेब्रुवारीला सामूहिक नमाज पठण झाले होते. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायर झाला. तत्पूर्वी उमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात, टिपू सुलतान यांच्या फोटो लावल्यावरून वादंग झाला होता. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नाशिक-मालेगावचा दौरा करत, त्यावरून वादळ उठलं.

महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात नमाज पठण झाल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, त्याचे मालेगावसह राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. अनेकांनी नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली. किरीट सोमय्या यांनी समाज माध्यमांवर व्हिडिओ पोस्ट करत कारवाईची मागणी केली. विद्युत विभागाचे अभियंता अभिजित पवार यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले.

या मुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. शिस्तभंगाची नोंद घेत पुढील चौकशी सुरू असतानाच, हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात हनुमान चालिसा म्हणत, निषेध केला. पण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे मालेगावातील धार्मिक वाद विकोपाला पोहोचला आहे. राजकीय रंग देण्याच्या नादात यातून कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती अधिक बिक होते की, काय अशी चर्चा आहे. मात्र मालेगावमधील पोलिस दल अलर्ट करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT