Gokul Gitte_Narendra Darade_Nashik MLC Election 
उत्तर महाराष्ट्र

Nashik MLC Election: सर्व १४ अर्ज वैध! शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना भाजपचे बंडखोर गोकुळ गीतेंचं आव्हान कायम

Nashik MLC Election : नाशिक विधान परिषदेला शिवसेना एकनाथ शिंदे आणि मालेगावचा 'इस्लाम' पक्ष समोरासमोर!

Sampat Devgire

Nashik MLC Election: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत नवा राजकीय ट्विस्ट आला आहे. नाशिक मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांसह नऊ जणांनी १४ अर्ज दाखल केले होते. आज छाननीत हे सर्व अर्ज वैध ठरले. त्यामुळे माघारीपर्यंत जोरदार राजकीय घडामोडी घडण्याच्या शक्यता वाढल्या.

राजकीय दृष्ट्या या निवडणुकीला एक नवे वळण देखील प्राप्त झाले आहे. अधिकृत राजकीय पक्ष म्हणून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नरेंद्र दराडे उमेदवार आहेत. त्याशिवाय मालेगाव महापालिकेत सत्तेत असलेल्या इस्लाम पक्षाचे महंमद खालिद अब्दुल रशीद यांचा अर्ज वैध ठरला. हे दोघे अधिकृत पक्षाचे उमेदवार आहेत.

या व्यतिरिक्त भाजपचे (बंडखोर) स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते, त्यांचे बंधू आणि पिंपळगाव बाजार समितीचे संचालक गोकुळ गीते, निवृत्ती उर्फ गोरख बोडके, कुणाल दराडे, विष्णूपंत म्हैसधुने, प्रसाद हिरे आणि परवेझ कोकणी हे अपक्ष उमेदवार आहेत. यातील बोडके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तर गीते बंधू भाजपचे बंडखोर असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

उमेदवारी अर्ज छाननीनंतर नऊ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. यातील कुणाला दराडे हे दराडे कुटुंबीयांचेच सदस्य आहेत. उर्वरित पाच उमेदवारांच्या माघारीसाठी आता राजकीय घडामोडी वेग घेतील. त्यात मंत्री छगन भुजबळ आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन काय भूमिका घेतात याची उत्सुकता असेल. गोकुळ गीते यांनी आपण आता सर्व पक्षांच्या मतदारांच्या गाठीभेटी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या दृष्टीने निवडणूक काय वळण घेते, याकडे लक्ष लागले आहे.

मालेगाव महापालिकेत सत्तेत असलेल्या माजी आमदार आसिफ शेख यांच्या इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंबली ऑफ महाराष्ट्र अर्थात "इस्लाम" या पक्षाचे ३५ नगरसेवक आहेत. त्यांना समाजवादी पक्षाच्या पाच आणि काँग्रेसच्या तीन अशा एकूण 43 सदस्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांत निवडणूक झाल्यास शिवसेना विरुद्ध इस्लाम ही निवडणूक राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT