West Bengal: प. बंगालचा 'एकनाथ शिंदे' होणार हा नेता? तृणमूल काँग्रेसमध्ये गुप्त बैठका सुरु, लवकरच राजकीय भूकंपाची शक्यता

West Bengal: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला पराभव पत्कारावा लागला. यानंतर इथं अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
west bengal former cm mamata banerjee
west bengal former cm mamata banerjee
Published on
Updated on

West Bengal News : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला पराभव पत्कारावा लागला. यानंतर इथं अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ता गमावल्यानंतर आमदार सैरभर होतात, हे चित्र आता देशभरात सर्वाच राज्यात दिसायला लागलं आहे. यापार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसमधला हा नेता पश्चिम बंगालचा एकनाथ शिंदे होण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे. ऋतब्रता बॅनर्जी असं या नेत्याचं नाव असून तो तृणमूलमधील अनेक आमदारांना सोबत घेऊन बंडखोरीच्या तयारीत आहे.

west bengal former cm mamata banerjee
Sunil Tatkare : तटकरेंकडून पुन्हा शिवसेनेला धोबीपछाड, गोगावलेंसह थोरवेंची तलवार म्यान; पण दळवींच्या कन्येचं काय?

नेमकं काय घडलं?

तृणमूल काँग्रेसचे दोन बडे नेते ऋतब्रता बॅनर्जी आणि संदपान साहा यांची पक्षातून नुकतीच हाकालपट्टी करण्यात आली आहे. पण हा विषय इथेच संपलेला नाही तर, खरा राजकीय खेळ इथूनच सुरु झाला आहे. ऋतब्रता बॅनर्जी आणि संदीपान साहा यांची नावं पश्चिम बंगालच्या राजकारणात नवी नाहीत. राज्यात त्यांची अत्यंत प्रखर, उच्चशिक्षित आणि आक्रमक विद्यार्थी नेत्यांमध्ये गणना होत राहिली आहे. २०२६ मध्ये हावडा जिल्ह्यातील उलुबेरिया पूर्व या जागेवरुन उमेदवारी दिली होती इथं त्यांचा विजय झाला होता. पण १ जून २०२६ रोजी टीएमसीनं त्यांना बनावट सह्यांच्या आरोपांमुळं ममता बॅनर्जी यांनी पक्षातून हाकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जी-अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात आरपारची लढाई सुरु केली आहे.

west bengal former cm mamata banerjee
Nashik Kumbh Mela : नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यात 4500 बस धावणार, खासगी वाहनांना मर्यादा.. अमृत स्नानासाठीही बसनेच जावे लागणार

या दोघांच्या हाकालपट्टीमुळं तृणमूल काँग्रेसच्या आमदारांची संख्या आता ८० वरुन ७८ राहिली आहे. पण यामुळं या दोघांची आमदारकी देखील जाऊ शकते, पण ती त्यांना टिकवायची असेल तर त्यांना पक्षातील दोन तृतीयांश आमदार फोडून नवा गट तयार करावा लागेल. त्यामुळं ७८ पैकी दोन तृतीयांश म्हणजे ५२ आमदारांची गरज आहे. त्यामुळं ऋतब्रता बॅनर्जी आणि संदीपान साहा या दोघांनी काल रात्री तृणमूलमध्ये ममता बॅनर्जींवर नाराज असलेल्या आमदारांची बैठक घेतल्याची चर्चा आहे. हे नाराज आमदार सातत्यानं ऋतब्रता आणि संदीपान यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळं आता महाराष्ट्रात शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपाप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये आणि ते ही तृणमूल काँग्रेसमध्ये हीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेत बंडाचा प्रमुख नेता जसे एकनाथ शिंदे ठरले होते, तसा नेता आता ऋतब्रता बॅनर्जी ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

west bengal former cm mamata banerjee
"तू वेडा झाला आहेस, मी नसतो तर तू तुरुंगात असतास...", इराण युद्ध पेटवणाऱ्या नेत्यानाहू यांना ट्रम्प यांनी फोनवरून झापलं

कोण आहेत ऋतुब्रता बॅनर्जी?

सन २०२० मध्ये ऋतुब्रता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांची संगठनात्मक क्षमता पाहिल्यानंतर ममता बॅनर्जींनी त्यांच्यावर पक्षाचं महत्वपूर्ण विंग INTTUC (इंडियन नॅशनल तृणमूल ट्रेड युनियन काँग्रेस) च्या पश्चिम बंगालच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. २०२६ मध्ये टीएमसीनं त्यांना हावडा जिल्ह्यातील उलुबेरिया पूर्व या मतदारसंघातून तिकीट दिलं. या ठिकाणावरुन ते पहिल्यांदा आमदार म्हणून जिंकून आले.

कोण आहेत संदीपन साहा?

संदीपान साहा हे कोलकात्याच्या जमिनीवरील राजकारणातील मजबूत आणि तरुण चेहरा म्हणून ओळखले जात होते. पक्षातील ते एक ताकदवान आणि प्रामाणिक नेते मानले जात होते. संदीपान साहा हे कोलकात्यातील सर्वाधिक हॉटसीट पैकी एका एंटाली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. सन २०२६ च्या आव्हानात्मक निवडणुकीत भाजपचे दिग्गज नेते प्रियांका टिबरेवाल यांना ३४,००० हून अधिक मतांनी पराभूत केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com