Ganesh Gite Files Nomination in Nashik MLC : महायुतीत विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा सुरु होती. यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर व पुणे येथील जागेचा तिढा वाढला होता. तो सोडवण्यासाठी वरीष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु असताना नाशिकमध्ये भाजपचे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती व मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
गणेश गिते यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक व अनुमोदक म्हणून सह्या करणारे भाजपचे ९ नगरसेवक अडचणीत येण्याची शक्यता आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी या नऊ नगरसेवकांकडून खुलासा मागविला आहे.
महायुतीच्या १७ जागांचे अधिकृत वाटप झालेले नव्हते. मात्र, असे असताना गणेश गिते यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. एक उमेदवारी अर्ज अपक्ष तर एक अर्ज पक्षाकडून दाखल केला असल्याचा दावा गिते यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
या ९ नगसेवकांनी केल्या सह्या
गणेश गिते यांच्या अर्जावर भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील, संगीता घोटेकर, नितीन निगळ, प्रशांत दिवे, आदिती पांडे, सुरेश पाटील, राजेंद्र आहेर, सोनाली भंदुरे आणि माजी महापौर रंजना भानसी या नऊ भाजप नगरसेवकांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली आहे. भाजपने अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नव्हता, अशा स्थितीत पक्षातील वरिष्ठांनी परवानगी न घेताच सह्या केल्याने या ९ नगरसेवकांकडून आता पक्षाने खुलासा मागितला आहे.
भाजप व शिवसेनेत नाशिकच्या जागेबाबत चर्चा सुरु होती. अशावेळी भाजपच्या प्रवक्त्यांनी देखील उमेदवारी जाहीर न झाल्याने कोणीही परस्पर पक्षाकडून दावा करू नये, अशा सूचना दिल्या होत्या. तरीही गिते यांनी अर्ज दाखल केल्याने पक्षाने त्यांची गंभीर दखल घेतल्याचे दिसत आहे. गिते यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणाऱ्या नगरसेवकांकडून खुलासा मागविणार आहेत. सर्वांचा खुलासा एकत्र करून तो वरिष्ठांकडे पाठविला जाणार आहे.
पक्षशिस्तीच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे संकेत शहराध्यक्ष केदार यांनी दिले आहेत. नगरसेवकांशी चर्चा करून लवकरच अहवाल सादर करणार असल्याचे केदार यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.