Nashik MLC Election : नरेंद्र दराडे निवडणुकीच्या रिंगणात, आता मंत्री भुजबळ महायुतीचा धर्म पाळणार की पडद्याआड वेगळं राजकारण घडणार?

Chhagan Bhujbal, Narendra Darade : येवल्यासह नाशिकच्या राजकारणात दराडे विरुद्द भुजबळ हे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे आता भुजबळ महायुतीचा धर्म पाळून दराडेंना मदत करतात की वेगळं राजकारण होतं ते पाहावे लागेल.
Chhagan Bhujbal, Narendra Darade,
Chhagan Bhujbal, Narendra Darade,Sarkarnama
Published on
Updated on

Nashik MLC Election : महायुतीच्या जागावाटपात नाशिक विधानपरिषेदची जागा शिवसेनेने राखली आहे. शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दराडेंनी आज आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. नाशिकच्या राजकारणात दराडे विरुद्द भुजबळ हे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे आता मंत्री छगन भुजबळ कोणती भूमिका घेतात याची उत्सुकता आहे.

महाविकास आघाडीमध्ये नाशिकची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली आहे. नाशिकला महाविकासआघाडीकडून माजी आमदार अनिल कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नरेंद्र दराडे विरुद्ध अनिल कदम अशी दोन माजी आमदारांमध्ये ही लढत रंगणार आहे. भाजपच्या गणेश गिते यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यास तिरंगी सामना होऊ शकतो.

सामना तिरंगी झाल्यास नरेंद्र दराडेंना ही निवडणूक अवघड जाईल. कारण अशावेळी मंत्री भुजबळ यांची भूमिका निर्णायक ठरेल. मात्र, गिते यांनी माघार घेतल्यास दराडेंचा विजयाचा मार्ग अधिक सोपा होईल. मात्र, या सगळ्यात भुजबळ हे महायुतीचा धर्म निभावत अधिकृत उमेदवार असलेल्या नरेंद्र दराडे यांच्या मागे उभे राहतील की, पडद्यामागे वेगळे राजकारण घडेल? हा प्रश्न सध्या नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.

Chhagan Bhujbal, Narendra Darade,
Nashik MLC Election: अखेर नाशिक शिवसेनेकडे; नरेंद्र दराडे-अनिल कदम यांच्यात लढत; भाजपचे गणेश गीते बंडखोरी करणार?

नाशिक विधानपरिदेचे जवळपास ६२३ मतदान आहे. यात महायुतीचे पारडे जड आहे. भाजपकडे जवळपास १९०, शिवसेनेकडे १७० तर राष्ट्रवादीकडे १०७ मतदान आहे. अशा परिस्थितीत भाजप-शिवसेना मैत्री पूर्ण लढत झाली असती तर निश्चितच दराडेंना त्याचा फटका बसला असता. कारण भुजबळांनी गणेश गिते यांच्या पाठिमागे राष्ट्रवादीची ताकद लावली असती. त्यामुळेच दराडे समर्थकांना ही मैत्रिपूर्ण लढत नको होती असे बोलले जात आहे.

आता दराडे महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याने भाजप व राष्ट्रवादीला त्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभे राहावे लागेल. भाजप व शिवसेनेचे संख्याबळ पाहाता नरेंद्र दराडेंचा विजय सहज - सोपा आहे. त्यामुळे आता अशापरिस्थितीत भुजबळांची जादू कितपत चालेल हे पाहावे लागेल.

Chhagan Bhujbal, Narendra Darade,
Nashik Crime : जमीन बळकावली अन् 90 लाखांची खंडणी, राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक अडचणीत, पोलिसांनी घेतली मोठी अ‍ॅक्शन

शिवसेनेत सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे या देखील इच्छुक उमेदवार होत्या. मात्र, दराडेंनी बाजी मारत पुन्हा एकदा ही उमेदवारी स्वत:साठी खेचून आणली. त्यामुळे सुहास कांदे यांची भूमिका देखील या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com