Gokul Gite, Narendra Darade Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MLC Election : मी प्रचार थांबवतोय... गोकुळ गितेंनी एका शब्दात मिटवला विषय, दराडेंना पाठिंबा देण्याच्या प्रश्नावर बोलणं टाळलं

Gokul Gite Withdraws from Nashik MLC Election Race : गोकुळ गिते यांना आपण नाशिक विधानपरिषद निवडणुकीचा प्रचार थांबवत असल्याचे जाहीर केले. मात्र, नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा देणार का या प्रश्नावर बोललं टाळलं.

Ganesh Sonawane

Nashik MLC Election : नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीचा तिढा अखेर सुटला आहे. गोकुळ गिते हे निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. त्यानंतर स्वत: गोकुळ गिते यांनी देखील आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली.

आज गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांच्या निवासस्थानी महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. पत्रकार परिषदेत बोलताना, मी प्रचार थांबवत असल्याचं गोकुळ गिते यांनी जाहीर केलं. मात्र, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार का व त्यांच्या प्रचारात थेट सहभागी होणार का हा प्रश्न माध्यम प्रतिनिंधींनी केला असता गोकुळ गिते यांनी त्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. खूर्चीवरुन गोकुळ गिते ताडकन उठले. मी माझा प्रचार थांबवतोय एवढाच शब्द तुम्ही घ्या असे आवाहन त्यांनी प्रसारमाध्यमांना केलं.

तुमच्यावर दबाव आणला गेला का? आपण चौकशीला घाबरले आहात का, असे विचारले असता... मी कोणत्याही चौकशीला घाबरलो नाही. तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे. आम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानपरिषदेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी सत्ताधारी पक्ष समोर होता. तरी ती निवडणूक मी अंगावर घेतली होती. तुम्ही सगळे साक्षीदार आहात. तेव्हा ही पण घाबरलो नाही आणि आताही घाबरण्याचे कारण नाही असं गोकुळ गिते म्हणाले.

कार्यकर्त्यांचा रेटा होता म्हणून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मतदारांची महायुतीच्या उमेदवाराविरोधात नाराजी होती. महायुतीच्या नेत्यांनी त्यांना समज दिली आहे. त्यांच्याशी समोरा-समोर झालेल्या चर्चेतही त्यांना मी तेच सांगितलं. दोन-दोन आमदार आपल्या घरात आहेत, लोकांची कामं करा..असं गोकुळ गिते दराडेंना उद्देशून म्हणाले.

सुरुवातीपासून माध्यमांमध्ये महाजन व गिते निकटवर्तीय आहेत असा शब्द वापरला गेला. ते खरे आहे, मंत्री महाजन हे आमचे मार्गदर्शक आहे. मी जरी भाजपचा सक्रीय कार्यकर्ता नसलो तरी माझे बंधू पक्षात आहे. आमच्या कुटंबावर महाजन यांचा सदैव कृपा आशीर्वाद राहिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मला महाजनांचे पाठबळ मिळत असल्याचा संशय येत होता. त्यामुळे गिरीशभाऊंवर वरतून मोठा दबाव होता. सुहास कांदे यांचाही मला योग्य तो निर्णय घेतला गेला पाहीजे असा रेटा होता. शिंदे साहेबांशीही माझं बोलणं झालं.

कधीकधी कौटुंबिक जबाबदारीचे भान आपण ठेवलं पाहीजे. आमदारकी मला भविष्यातही मिळू शकते. मंत्री सामंत साहेब, महाजन साहेब, दादा भुसे साहेब, आमदार कांदे साहेब व माझे मोठे बंधू गणेश गिते यांच्यापेक्षा मला माझी आमदारकी मोठी वाटत नाही. या सगळ्यांनी माझी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांचा मी मान ठेवतो. कौटुंबिक शांती व आमदारकी यामध्ये मला कौटुंबिक शांती महत्वाची वाटते म्हणून मी प्रचार थांबवत असल्याचं गोकुळ गिते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT