Congress and Shivsena Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena Vs Congress : काँग्रेसच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा, महाविकास आघाडीतील संघर्ष टोकाला

Shivsena Vs Congress Chandwad Deola constituency : लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे आघाडीतील पक्षांत ओढाताण होणार असल्याचे दिसत आहे. कारण काँग्रेसच्या चांदवडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे.

Sampat Devgire

Nashik News, 29 June : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप सोपे नसणार याची जाणीव होऊ लागली आहे. काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या चांदवड देवळा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे.

चांदवड देवळा या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्या पारंपरिक लढत होत आली आहे. यंदा मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे घटक पक्षांत ओढाताण होणार, असे दिसते. महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने जोरदार इशारा देत दावा केला आहे.

यासंदर्भात शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. शिवसेनेची संघटनात्मक ताकद मोठी आहे. शेतकरी आणि सामान्य नागरिकांना शिवसेना सगळ्यात जवळचा पक्ष वाटतो. त्यामुळे राज्यातील शेतकरी विरोधी सरकारला धडा शिकविण्याची ताकद शिवसेनेतच आहे. बेरोजगार युवकांसाठी शिंदे सरकार काहीही करत नाही. महाराष्ट्रतील प्रकल्प आणि संस्था गुजरातला देण्याचा धडका महायुती सरकारने लावला आहे.

नागरिकांत या सरकारविरुद्ध प्रचंड रोष आहे. त्या विरोधात आवाज बुलंद करण्याचे काम निस्वार्थी शिवसेना करीत आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे हमखास विजय होईल. आघाडीच्या अन्य पक्षांनी ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाला सोडावी, अशी मागणी या मेळाव्यात करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख नितीन आहेर, युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, जिल्हा उपप्रमुख रवींद्र काळे, सुनील पवार, चंद्रकांत देवरे, विजय वाफळे, विलास भवर, दत्ता शिंदे, विधानसभा संपर्कप्रमुख सोमनाथ पगार यांसह मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT