Kundlik Khande Arrested : बीडमधील व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी चर्चेत असलेल्या कुंडलिक खांडे यांना अटक, कारण काय?

Kundlik Khande Arrested viral audio clip : कुंडलिक खांडे यांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड -अहमदनगर महामार्गावरील जामखेड येथून त्यांना अटक केली. तसेच त्यांना बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले.
Kundlik Khande
Kundlik Khande sarkarnama
Published on
Updated on

Kundlik Khande News : शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची काही दिवसांपूर्वी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्यील पंकजा मुंडेंना कशी मदत केली नाही. धनंजय मुंडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याच्या संदर्भातील संवाद आहे. या प्रकरणी कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा देखील झाला आहे. मात्र, त्यांच्यावर काही महिन्यापूर्वी 307 चा गुन्हा देखील दाखल झाला होता. याच गुन्ह्यात खांडे यांना अटक झाली आहे.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी खांडे यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल झाला होता. जामखेड येथे कुंडलिक खांडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कुंडलिक खांडे यांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी Police बीड -अहमदनगर महामार्गावरील जामखेड येथून त्यांना अटक केली. तसेच त्यांना बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले.

Kundlik Khande
Eknath Khadse : मनाने भाजपमध्ये असणाऱ्या नाथाभाऊंचा सरकारवर भरोसा नाय का?

कुंडलिक खांडे यांची कथित एक ऑडिओ क्लिप 2 दिवसांपूर्वी व्हायरल झाल्यानंतर परळी आणि बीडमध्ये पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धोका देत खांडे यांनी बजरंग सोनवणे यांचं काम केल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये केला जात आहे. ऑडिओ क्लिपमध्ये खांडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करून त्यांची गाडी फोडण्याबाबत वक्तव्य केले होते.

या क्लिप वरून राष्ट्रवादी NCP अजित पवार गटाचे नेते वाल्मिक कराड यांच्या तक्रारीवरून कुंडलिक खांडे व शिवराज बांगर यांच्या विरुद्ध परळी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी एलसीबी आणि परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पथक रवाना झाली होती.दरम्यान जामखेड येथे कुंडलिक खांडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

(Edited By Roshan More)

Kundlik Khande
Ajit Pawar Letter : लोकसभेत सुनेत्रा वहिनींचा पराभव का झाला? अजितदादांना कार्यकर्त्यानं सांगितली गावागावातील कथा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com