Video Sharad Pawar : अर्थसंकल्पावर शरद पवार स्पष्टचं बोलले, 'लोकं विश्वास ठेवणार नाहीत'

Sharad Pawar Reaction Budget : अर्थसंकल्पात सुचवायचे की अधिक रक्कम दिली जाईल. एकंदरीत जमा, एकंदरीत महसूल तूट, एकंदरीत लागणारी आवश्यकता याचा विचार केला तर आवश्यकतेपेक्षा किती तरी कमी पैशाची उपलब्धता आहे, असे शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. महिलांसाठी लाडकी बहिण योजना जाहीर केली. विधानसभा निवडणुकीत ही योजना गेम चेंजर ठरेल, असा दावा केला जातो आहे. या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'विधानसभेचा अर्थसंकल्प बघितल्यानंतर या गोष्टी कृतीत येणार नाहीत. त्यासाठी पुरेसी तरतूद नाही.असा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे. अर्थसंकल्पा हा विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर मांडला आहे. ज्या तरतूदी केल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचायला कित्येक महिने लागतील. लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

अर्थसंकल्पात सुचवायचे की अधिक रक्कम दिली जाईल. एकंदरीत जमा, एकंदरीत महसूल तूट, एकंदरीत लागणारी आवश्यकता याचा विचार केला तर आवश्यकतेपेक्षा किती तरी कमी पैशाची उपलब्धता आहे. एका दृष्टीने लोकांना काही तरी भयंकर करतोय असे दाखवायचे. माझा विश्वास आहे. लोकांचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही, असे देखील शरद पवार Sharad Pawar म्हणाले आहेत.

Sharad Pawar
Shivsena Vs Congress : काँग्रेसच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा, महाविकास आघाडीतील संघर्ष टोकाला

अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीवर देखील शरद पवारांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले. विधानसभात या अर्थसंकल्पाचा फायदा महायुतीला होईल का? या प्रश्नावर प्रत्यक्षा अंमलबाजवणी कधी होईल यावर आहे. ज्या तरतूदी केल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचायला कित्येक महिने लागतील. जर एखाद्या गोष्टीला 100 रुपये लागणार असतील तर माझ्याकडे 70 रुपये आहेत, याचे समर्थन कसे करणार, असे सांगत शरद पवारांनी अर्थसंकल्पातील Budget महसूल तूटीवर बोट ठेवले.

अजित पवार गटातील काही आमदार हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इच्छुक असल्यास विषयी शरद पवार यांनी विचारण्यात आले. मात्र, विषयी आपल्याला काही माहिती नाही. याविषयी जयंतरावांना माहित असेल मला माहित नाही. तसा प्रस्ताव नाही, असे सांगितले

Sharad Pawar
Kundlik Khande Arrested : बीडमधील व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी चर्चेत असलेल्या कुंडलिक खांडे यांना अटक, कारण काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com