Anil Kadam Diliprao Bankar  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Niphad politics : निफाडमध्ये आजी-माजी आमदारांना तिसऱ्या खेळाडूची धडक, तिहेरी लढत रंगणार

Dilip Bankar, Anil Kadam : निफाडमध्ये एकीकडे आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच अटळ आहे. तर दुसरीकडे नवीन पिढी निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी शड्डू ठोकून आहे.

सरकारनामा ब्युरो

Nashik Niphad Politics : निफाड तालुक्यातील गट-गणांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यात रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसत आहे. निफाडच्या राजकीय पटलावर आपली छाप उमटवण्यासाठी नवीन पिढी निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी शड्डू ठोकण्याच्या तयारीत असल्याने तिहेरी लढती रंगणार, असे दिसते.

  • उमेदवारीसाठी पक्ष

    बदलण्याची मानसिकता

  • आरक्षणामुळे सौभाग्यवतींना लॉटरी.

  • आठ गट आणि १६ गणांमध्ये होणार लढाई.

  • आरक्षित जागेवर सर्वच पक्षांसमोर उमेदवार शोधण्यासाठी डोकेदुखी.

  • सर्वच पक्षांमध्ये बंडाळीची शक्यता.

गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तयारीत असलेले कार्यकर्ते आज आरक्षण सोडतीनंतर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. जिल्हा परिषद नाही तर पंचायत समिती तरी लढू असा चंग बांधत नेत्यांना डावलून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची काहींनी तयारी केली आहे. काही इच्छुकांनी उमेदवारी न मिळाल्यास पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षातून तिकीट घेऊन लढण्याची तयारी चालवली आहे.

सोडतीमध्ये निफाड तालुक्यातील महत्त्वाचा म्हणून पालखेड गटाकडे बघितले जाते. या गटात पालखेड आणि नांदुर्डी हे दोन गण येतात. या गटात आणि गणामध्ये राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना (उबाठा) असा तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे. लासलगाव गट हा आरक्षित झाल्याने अनेकांच्या इच्छेवर पाणी फिरले आहे. या गटातील लासलगाव गणामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना (उबाठा) आणि भाजप यांच्यात लढत होणार असून इतर पक्षांवर गट-गणासाठी उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.

विंचूर गटामध्ये विंचूर आणि डोंगरगाव हे दोन गण असून या ठिकाणीसुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात लढत होईल. मावळत्या जिल्हा परिषद अध्यक्षांचा गट असल्याने उगाव गटाकडे सर्वांचे लक्ष आहे. या गटात कोठुरे व उगाव हे दोन गण असून या गट-गणांमध्ये दोन्ही शिवसेना, काँग्रेस व भाजप यांच्यात प्रमुख लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. कसबे सुकेणे गटासह कसबे सुकेणे आणि कोकणगाव या गणांमध्ये शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी यांच्यात लढत होणार असली तरी भाजप कार्यकर्त्यांची येथे मोठी संख्या असल्याने तिरंगी लढत होणार आहे. चांदोरी गटामध्ये पिंपळस आणि चांदोरी गणात पारंपरिक राष्ट्रवादी विरोधात शिवसेना (उबाठा) यांच्यात जोरदार लढतीचे संकेत मिळत आहेत.

सायखेडा गट आरक्षित झाल्याने अनेक दिवसांपासून लढण्याची तयारी करणाऱ्या नेत्यांना आता आपल्या सौभाग्यवतींना मैदानात उतरविण्याची तयारी करावी लागणार आहे. करंजगाव आणि सायखेडा येथेही अशीच परिस्थिती आहे. नांदूरमध्यमेश्वर गटासह नांदूरमध्यमेश्वर आणि देवगाव गणामध्ये राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना (उबाठा) यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT