Manisha Khatri Nashik NMC Commissioner Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik NMC : नाशिकमध्ये मॉल, पेट्रोलपंप, हॉटेलमधील स्वच्छतागृहे महिलांसाठी मोफत ; महापालिका आयुक्त मनीषा खत्रींचे व्यावसायिक आस्थापनांना आवाहन

Free Toilets for Women In Nashik : महिलांसाठी नाशिक महापालिकेने महत्वाचा उपक्रम हाती घेतली आहे. नाशिक महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून विविध आस्थापनांना आवाहन केलं आहे.

Ganesh Sonawane

Nashik NMC News : शहरात शिक्षण, नोकरी, व्यवसाय, खरेदी, आरोग्यसेवा यासह विविध कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने महिला आणि मुली ये-जा करतात. यासह ग्रामीण भागातूनही महिला मोठ्या संख्येने शहरात येत असतात. अशावेळी त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि सहज उपलब्ध अशी स्वच्छतागृहाची सुविधा मिळावी, या उद्देशाने महापालिकेने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

महापालिका हद्दीतील मॉल, मल्टिप्लेक्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पेट्रोलपंप तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांमधील महिलांची स्वच्छतागृहे विनामूल्य वापरासाठी खुली करावीत, असे आवाहन नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी केले आहे.

शहरातील अनेक व्यावसायिक आस्थापनांमध्ये स्वच्छतागृहांची सुविधा आहे. मात्र, ही सुविधा सर्वसामान्य महिलांना सहज उपलब्ध होत नाही. अनेक ठिकाणी परवानगीची अट असते, काही ठिकाणी शुल्क किंवा कर्मचाऱ्यांकडून होणारी अडवणूक यामुळे महिलांची गैरसोय होते. महिलांना ही अडचण भेडसावू नये आणि शहरात स्वच्छ व महिलांसाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे, यासाठी महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे.

त्यानुसार संबंधित आस्थापनांनी आपल्याकडील महिलांचे स्वच्छतागृह कोणतेही शुल्क न आकारता वापरासाठी उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी केले आहे. महिलांना मूलभूत स्वच्छता सुविधा सुलभपणे मिळाव्यात या दृष्टीने राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमात सर्व संबंधित आस्थापनांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

या स्वच्छतागृहांमध्ये नियमित स्वच्छता राखली जावी, पुरेसा पाणीपुरवठा, योग्य प्रकाशव्यवस्था आणि कचरापेटी, साबण आदी आवश्यक स्वच्छता साहित्य ठेवले जावे, जेणेकरून महिलांना ती सन्मानपूर्वक आणि सुरक्षितपणे वापरता येतील, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

विनामूल्य वापराचे फलक

शहरातील मॉल, मल्टिफ्लेक्स, हॉटेल्स, रेस्टॉरट्स, पेट्रोलपंप तसेच अन्य व्यावसायिक आस्थापनांना ही सुविधा महिलांच्या सहज लक्षात यावी यासाठी दर्शनी भागात महिलांसाठी स्वच्छतागृह विनामूल्य वापरास उपलब्ध असल्याचा स्पष्ट फलक लावण्याची सूचनाही करण्यात आली आहे. तसेच आस्थापनांतील कर्मचारी आणि व्यवस्थापनाने याबाबत महिलांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT