MLC Election 2026: पदवीधर-शिक्षक मतदारसंघाचं जागावाटप ठरलं? 3-1-1 फॉर्म्युल्यात पुण्याचा पेच कायम

MLC Graduate Teachers Constituency Election: भाजपने तीन जागा, शिवसेना एक तर राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा पदरात पाडून घेतल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे.
Eknath Shinde | Sunetra Pawar | Devendra Fadnavis
Teachers MLC Elections Maharashtra 2026Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News: विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमधील महायुतीचे जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत या पाच मतदारसंघातील जागा वाटपाचा प्राथमिक फॉर्मुला तयार झालेला आहे.

भाजपने तीन जागा, शिवसेना एक तर राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा पदरात पाडून घेतल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान भाजप आणि शिवसेनेकडून पुणे शिक्षक मतदार संघावर दावा केला जात असला तरी हा शिक्षक मतदार संघ भाजपकडे येण्याची चिन्हे गडद झाली आहेत. त्यामुळे आता उमेदवार निवडण्यासाठी पुन्हा एकदा पुणे शिक्षक मतदार संघामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निर्णय घ्यावा लागणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात पाच जागा संदर्भात बैठक झाली. या बैठकीत पुणे पदवीधर, पुणे शिक्षक नागपूर पदवीधर हा मतदारसंघ भाजपला, अमरावती शिक्षक शिवसेनेला, तर छत्रपती संभाजी नगर पदवीधर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याची माहिती समोर येत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा दावा कायम असल्याने या एका जागेवर रस्सीखेच आहे.

Eknath Shinde | Sunetra Pawar | Devendra Fadnavis
Diveagar Accident: दिवेआगरमध्ये 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू; आळंदीतील विनर्स अकॅडमीला टाळे, पालक संतप्त, कर्मचारी कुठे?

पुणे पदवीधर हा मतदारसंघावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता. मात्र भाजपने या मतदारसंघावर दावा कायम ठेवला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातून सेटिंग मतदारसंघ सुटला आहे. शिवाय पुणे शिक्षक मतदार संघावर अजूनही भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस सुरू आहे. मात्र हा मतदार संघ ही भाजप आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी यशस्वी ठरला आहे.

Eknath Shinde | Sunetra Pawar | Devendra Fadnavis
Pradeep Purnekar Murder: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; गोवा सीमेवरून दोन मुख्य आरोपी ताब्यात

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विवेकानंद शिक्षण संस्थेचे कौस्तुभ गावडे यांच्यासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे गावडे यांची उमेदवारी अंतिम टप्प्यात निश्चित होऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीनेच पुणे शिक्षक मतदार संघामधील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com