Yeola explosives seizure : नाशिकच्या येवल्यात एवढा मोठा स्फोटकसाठा आला कुठून? 5 हजारांहून अधिक जिलेटीन कांड्या, 1595 डिटोनेटर जप्त

Explosives Seized in Yeola : खदाणीच्या कामासाठी शासकीय परवानगीशिवाय हा साठा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे.
Explosives Seized in Yeola
Explosives Seized in YeolaAI
Published on: 
Updated on: 

Yeola explosives seizure : नाशिकच्या येवला तालुक्यातील वाईबोथी गावात दहशतवादी विरोधी पथकाच्या नाशिक युनिटने व येवला तालुका पोलिसांनी धडक कारवाई करीत स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. खदाणीच्या कामासाठी शासकीय परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थांचा साठा करून ठेवल्यात आला होता.

पोलिसांनी वाईबोथी येथील साई मातोश्री स्टोन क्रशर परिसरात कारवाई करत तब्बल ५ हजार ६५ जिलेटीन कांड्या आणि १ हजार ५९५ व्यावसायिक डिटोनेटर जप्त केले आहेत. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील संशयित भगवान सुरेश वाघ याला अटक करण्यात आली आहे. तर इतर दोन जण फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

वाईबोथी येथील साई मातोश्री स्टोन क्रशर परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थ साठवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. खदाणीच्या कामासाठी कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय हा साठा करण्यात आल्याने छापा टाकण्यात आला. स्फोटक पदार्थांचा अशा प्रकारे अनधिकृत साठा केल्याने मानवी जीवितास तसेच परिसरातील सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली.

Explosives Seized in Yeola
Nashik Police : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, राजस्थानमधून तस्कर ताब्यात; एक कोटीचे ड्रग हस्तगत!

पोलिस शिपाई सचिन दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन भास्कर गायकवाड (रा. अंगणगाव, ता. येवला), भगवान सुरेश वाघ (रा. वाईबोथी, ता. येवला) आणि शरद आप्पासाहेब भड (रा. धामोडे, ता. येवला) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

Explosives Seized in Yeola
Nashik Kumbh Mela : सिंहस्थ बंदोबस्तासाठी नाशिकमध्ये 40 हजार पोलिसांची फौज ; निवासासाठी मंगल कार्यालये, लॉन्स, लॉजेस 60 दिवस ताब्यात घेणार

संशयितानी आर्थिक फायद्यासाठी खदाणीच्या कामाकरिता कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय स्फोटक पदार्थ साठवून ठेवले होते. त्यामुळे मानवी जीवितास आणि सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. स्फोटकांचा साठा बेकायदा बाळगल्याने मुख्य पुरवठादार एटीएसच्या रडारवर आला असून त्याची चौकशी सुरु होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com