Amol Khatal Criticism Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Amol Khatal Criticism : ठाकरेंच्या खासदारावर संशय, तर तांबेंनी माहिती दडवली; शिंदेचा शिलेदार कडाडला

Nashik-Pune Railway via Shirdi: Amol Khatal Criticizes Bhausaheb Wakchaure & Satyajeet Tambe : नाशिक-पुणे रेल्वेचा नवीन मार्ग जाहीर झाल्याने शिवसेनेचे अमोल खताळ यांची भाऊसाहेब वाकचौरे आणि सत्यजित तांबे यांच्यावर टीका केली.

Pradeep Pendhare

Sangamner Railway Issue : नाशिक-पुणे रेल्वे मार्गात संगमनेरला डावलल्याने तिथं जोरदार राजकारण तापलं आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात ता नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सर्वपक्षीय लढ्याची हाक दिली आहे.

यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी हा रेल्वे मार्ग संगमनेरमधून जाण्याची भूमिका घेत असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि आमदार तांबे यांच्यावर चांगलेच कडालले आहेत.

आमदार अमोल खताळ यांनी रेल्वे मार्गावरून, शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला. खासदार वाकचौरे यांनी पुणे–नाशिक रेल्वेमार्गाबाबत ठाम भूमिका घेणे आवश्यक होते. मात्र त्यांनी लोकसभेत या विषयावर भूमिका मांडली नाही, त्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद वाटते, असा गंभीर आरोप आमदार खताळ यांनी व्यक्त केला.

जीएमआरडीचे कारण देत हा रेल्वेमार्ग बदलणार असल्याची संपूर्ण माहिती पदवीधर आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना आधीपासून होती. तरीही त्यांनी ही माहिती जनतेपासून लपवून का ठेवली? केवळ राजकारणासाठी विकासाचा बळी दिला गेला काय? असे प्रश्न देखील अमोल खताळ यांनी उपस्थित केले.

राज्य सरकारचा या प्रकल्पात 50 टक्के वाटा असल्याने संगमनेरवर अन्याय होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वेळ आली तर महायुतीतर्फे जनतेच्या हितासाठी राजकारणविरहित जनआंदोलन उभारले जाईल, असेही अमोल खताळ यांनी स्पष्ट केले.

नाशिक–पुणे रेल्वेमार्ग संगमनेर मार्गेच व्हावा, ही आमची सुरुवातीपासूनची ठाम भूमिका असून यासाठीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे. नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न जोरदारपणे मांडणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. काही जण या मुद्द्यावर राजकारण करून ‘आपली पोळी भाजून घेण्याचा’ प्रयत्न करीत असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.

आमदार खताळ म्हणाले, "नाशिक–पुणे रेल्वेमार्ग संगमनेरवरूनच व्हावा, अशी आमची प्रारंभिक मागणी आहे. पावसाळी अधिवेशनातही आम्ही हा मुद्दा उपस्थित केला होता." लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात रेल्वेमंत्र्यांनी जीएमआरडीचा तांत्रिक अहवाल सादर करत मार्ग बदलण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे की पर्यायी ट्रॅक तयार करून मार्ग बदलणे पूर्णतः शक्य आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे, त्यामुळे हा रेल्वेमार्ग संगमनेर मार्गेच व्हायला हवा, याबाबत आमची भूमिका आजही ठाम आहे, असेही खताळ यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT