Malegaon political controversy : शिक्षण मंत्री दादा भुसे आणि अद्वय हिरे यांच्यात मालेगाव मतदार संघातील राजकारण अतिशय टोकाला पोहोचले आहे. त्या वादातून शिक्षण विभागाने हिरे यांच्या संस्थेविरुद्ध मोहिमच उघडली अशी स्थिती आहे.
त्यामुळे हिरे यांच्या विरोधात अनेक तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या. अद्वय हिरे यांना अटक देखील झाली.
राजकीय संघर्ष आता थेट घरापर्यंत आणि शिक्षण संस्थेपर्यंत उघडपणे पोहोचला आहे. मंत्री भुसे (Dada Bhuse) यांनी हिरे यांच्यावर गंभीर आरोप केला. हिरे यांच्या पन्नास वर्षाहून जुन्या संस्थेवर गुणवत्ता आणि आर्थिक भ्रष्टाचाराचा थेट आरोप केला. त्याला हिरे यांनी देखील विना विलंब उत्तर दिले आहे. फेसबुक वरील हे राजकीय वाक् युद्ध जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहे.
अद्वय हिरे यांनी शिक्षण मंत्री भुसे यांना फेसबुकवर थेट प्रश्नच केला आणि त्यांच्या शासकीय नोकरी आणि मुलांच्या शालेय (School) गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला. हिरे आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात की, "आमच्या शाळांमध्ये गुणवत्ता नव्हती, तर माननीय शिक्षणमंत्र्यांनी स्वतःच्या मुलांना आमच्याच शाळेत शिक्षणासाठी का पाठवले?"
"स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी ज्या संस्थेवर विश्वास ठेवला. त्याच संस्थेच्या गुणवत्तेवर आज प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असेल, तर हा विरोधाभास महाराष्ट्रातील जनतेला समजावून सांगितला पाहिजे. आमच्या शाळेत शिकल्या मुळेच तर तुमची मुले मतीमंद झाली नसतील?"
"त्या काळात मुलांना कथितपणे अधिक “चांगल्या” शाळेत शिकवण्याची आर्थिक क्षमता नव्हती का? आणि तसे असेल, तर आज निवडणुकांच्या काळात खर्च होत असल्याचा आरोप केला जाणारा कोट्यवधी-अब्जावधी रुपयांचा पैसा नेमका कुठून येतो?" एवढ्यावरच न थांबता हिरे यांनी शिक्षण मंत्री भुसे यांचे सगळेच काढले. थेट आव्हान देत ते म्हणाले, आरोप-प्रत्यारोप नकोत. मंत्री महोदय तुम्ही, उत्तर कागदोपत्री द्या.
आमच्या शाळांची गुणवत्ता तपासा, अवश्य तपासा. पण त्याचबरोबर सार्वजनिक जीवनातील आर्थिक पारदर्शकताही तितक्याच कठोरपणे तपासा. शिक्षणाची गुणवत्ता आणि राजकारणातील आर्थिक पारदर्शकता, दोन्हींसाठी निकष समान असले पाहिजेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.