Sujat Ambedkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat: खरातच्या स्वीय सहाय्यकाच्या मृत्यू अन् संशयाचा धूर! मंत्र्यांकडं इशारा करत सुजात आंबेडकरांचा धक्कादायक दावा

Sujat Ambedkar on Ashok Kharat: वादग्रस्त कॅप्टन अशोक खरात प्रकरणाचा दोन महिन्यांपासून तपास सुरू आहे. या तपासात नेमकं काय निष्पण्ण झालं? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. यावर राजकीय नेत्यांनीही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Sampat Devgire

Sujat Ambedkar on Ashok Kharat: स्वयंघोषित ज्योतिषी, आध्यात्मिक गुरु आणि भोंदूगिरी करत शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातच्या स्वीय सहाय्यकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं या प्रकरणानं आता गंभीर वळण घेतलं असून यामध्ये अडकलेल्या प्रतिष्ठीत राजकीय व्यक्तींना वाचवण्यासाठी धडपड सुरु असल्याचे आरोप आता केले जात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी देखील या प्रकरणावर मोठा खळबळजनक आरोप केला आहे. प्रशासनातील यंत्रणा खरातच्या संपर्कात होती, त्यामुळं या प्रकरणाचा तपास प्रामाणिकपणे होतोय का? असा गंभीर सवालही त्यांनी व्यक्त केला आहे.

स्वीय सहाय्यकाचा मृत्यू अन् संशय

कॅप्टन अशोक खरात प्रकरणात एसआयटी तपास करत आहे. पोलीसही स्वतंत्रपणे त्याला ताब्यात घेऊन चौकशी करीत आहेत. दोन महिन्यांपासून खरात पोलिसांच्या ताब्यात आहे. कालावधीत त्याचा कोणत्या मंत्र्यांची संबंध आला व आहे यावर मौन का पाळले जात आहे?. असा प्रश्न आंबेडकर यांनी केला आहे. अशोक खरात यांच्या स्वीय सहाय्यकाचा समृद्धी महामार्गावर अपघात झाला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. खराब प्रकरणात कोणत्या मंत्र्यांचा संबंध आला त्यावर काहीही कारवाई झालेली नाही, या सर्व घटना बोलक्या आहेत, असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

मंत्रांना वाचवण्याचा प्रयत्न

मंत्र्यांना वाचविण्यासाठी वादग्रस्त कॅप्टन खरात याला जेलमध्येच मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा गंभीर आरोप आंबेडकर यांनी केला. त्यामुळेच या प्रकरणात कोणा कोणाचा संबंध आहे, याचा तपास झाला पाहिजे. मात्र त्यावर सगळ्यांचेच मौन आहे. अशोक खरात प्रकरण चर्चेत आल्यावर काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही फोटो बाहेर आले होते. हे सर्व फोटो नंतर कसे हटविण्यात आले? माध्यमांनी ते बाहेर काढले पाहिजे, असे सुजाता आंबेडकर म्हणाले.

भूसंपादनातून कॅप्टन खरात याला तीन कोटी रुपये मिळणार आहे. या बाबतची माहिती आता पुढे आली आहे. यामध्ये प्रशासनातील अधिकारी खरात यांच्या नियमित संपर्कात होते. त्यांची एक वेगळी संपर्क यंत्रणा होती, असा दावा देखील आंबेडकर यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT