

Maharashtra Fake Babas : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात विरोधात तक्रार दाखल होऊन दोन महिने पूर्ण झाले. खरात सध्या पोलिस कोठडीत असून ईडीच्या देखील रडारवर आहे. खरातने आपल्याकडील कथित शक्तीचा वापर करुन भोंदूगिरीच्या माध्यमातून अनेक महिलांचे लैगिंक शोषण व आर्थिक फसवणूक केली. नाशिकमधील भोंदू अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरल्यानंतर राज्यभरातल्या भोंदूवर कारवाईची मोहीम हाती घेतली. दोन महिन्यात पोलिसांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतून एकूण ३५ भोंदू बाबांवर गुन्हे दाखल केले आहेत.
खरात प्रकरणानंतर दोनच महिन्यात पोलिसांनी राज्यातील ३५ भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल करुन त्यांचे दरबार उधळून लावले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुन्ह्यांचे संकलन केले असल्याची माहिती राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिली आहे.
नाशिक येथे उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर दोन महिन्यात राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होणे ही पुरोगामी महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी व विचार करायला लावणारी घटना आहे. यातील अनेक भोंदूवर अंनिसच्या प्रयत्नाने गुन्हे दाखल झाले आहे. या यादीवरून असे लक्षात येते की, बहुतांश सर्वच धर्मातील भोंदूबाबा विरोधात गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केवळ हिंदू धर्मातच केले जाते हा काहींचा दावा फोल ठरल्याचं अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी म्हटलं आहे.
भोंदूबाबांनी ग्रामीण भागासह शहरी भागातील महिला व पुरुष यांची फसवणूक केल्याचे या घटनांवरून उघड झाले आहे. विशेषता यात महिलांवरील शाररिक शोषणासह आर्थिक लुटीचे प्रमाण अधिक आहे. भितीपोटी व सामाजिक प्रतिष्टेपोटी अनेक पीडित समोर येण्यास घाबरत आहे. खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना लढण्याची हिंमत निर्माण झाली आहे. त्यांना न्यायाची अपेक्षा देखील निर्माण झाली आहे. त्यामुळे इतरही आणखी पीडितांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
यातील बहुतेक प्रकरणात महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात भोंदूंचे पेव किती फुटले आहे, याची राज्यभर चर्चा चालू आहे. अंधश्रद्धेमुळे समाजातील फसवणूक रोखण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १८ वर्ष लढा दिला. या संघर्षानंतर २०१३ मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३’ हा कायदा अस्तित्वात आला. असा कायदा बनविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते. मात्र, या कायद्याची प्रभावी अंबलबजावणी करण्यात सरकार अयशस्वी ठरले असले तरी अंनिस आपल्या पातळीवर त्याचे प्रबोधन, प्रचार, प्रसार करत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत असल्याचे अंनिसने म्हटले आहे.
अंनिसने दिलेल्या माहितीनुसार जादूटोणा विरोधी कायदा किंवा इतर कायद्याच्या कलमाखाली दाखल झालेल्या ३५ गुन्ह्यांचा तपशील पुढील प्रमाणे:
१) अशोक कुमार खरात , नाशिक
२)गडगेबाबा राजेंद्र गडगे, संगमनेर , अहिल्यानगर
३) चेतन सुनील माळी,मूर्तिजापूर, अकोला
४) पंकज देवराम घोलप, येडगांव, पुणे
५)मोहन मामा भोसले, कुर्डुवाडी,
सोलापूर
६)नाना बर्डे , आळे फाटा , पुणे
७) ऋषिकेश वैद्य ,वसई ,मुंबई
८) अल्ताफ रईस खान ,मालाड, मुंबई
९) रिधम पांचाळ, मालाड, मुंबई
१०) गणेश शिंदे ,श्रीरामपुर, अहिल्यानगर
११) अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा , नवी मुंबई
१२)विठोबा वाल्मीक जाट, सातपूर, नाशिक
१३)किसन तळपे मंदोशी, खेड
१४ ) महेशगिरी उर्फ महेश काकडे,लासलगाव ,नाशिक
१५) अब्दुल रशीद शेख, खालापूर, रायगड
१६) इरफान नियाज अहमद , कांदिवली , मुंबई
१७) अनिल सोलोमन सिंग
( पादरी), पुणे
१८)शिवराम पराश सावर, पालघर
१९)अल्ताफ हसन मदारी, जळगाव
२०)नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर, टेंभुर्णी . सोलापूर
२१) पिंटू धुमाळ बारामती, पुणे
२२) हेमदास किसन बावणे,अड्याळ,भंडारा
२३) चंद्रकांत राजेंद्र माळी , इगतपुरी, नाशिक
२४) अशोक मधुकर आढाव, श्रीरामपूर,अहिल्यानगर
२५) औदुंबर गडदे, स्वारगेट, पुणे
२६)नवनाथ गवळी, खेड, पुणे
२७) शाहिद शेख, खडकपाडा,कल्याण
२८) शिव भाऊ सोनवणे, सर्जेपुरा, अहिल्यानगर
२९) ज्ञानेश्वर नागोराव कोरडे, बिलोली, नांदेड
३०) रमेश गुप्ता , मालाड , मुंबई
३१)हरिगिरी दत्तगिरी महाराज , भाग्यनगर, नांदेड
३२) मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित , ठाणे
३३) कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते,
पश्चिम देवपूर, धुळे
३४) यशवंत एकनाथ थोरात, पारनेर, अहिल्यानगर
३५) श्याम महाराज राठोड , दिघी , पुणे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.