Nashik TCS case Nida Khan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Conversion Case: नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर अन् अत्याचार प्रकरणी महत्वाची अपडेट; मुख्य संशयित आरोपी निदा खानला जामीन मंजूर

Nashik TCS Case: नाशिकच्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडवली होती. आता याप्रकरणी सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Deepak Kulkarni

Nashik News: नाशिकच्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडवली होती. आता याप्रकरणी सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे

नाशिक सत्र न्यायालयाकडून निदा खानला सोमवारी(ता.6 जुलै) सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे याप्रकरणातील दुसरा मुख्य संशयित आरोपी दानिश शेखचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

शहरातील आयटी कंपनीतील धर्मांतरप्रकरणी निदा खानवर देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महत्त्वाची बाब म्हणजे नाशिक शहरात याप्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी तौसिफ बिलाल आत्तारलाही न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. त्याच्याविरोधात इतर 5 गुन्ह्यांची नोंद असतानाही त्यालाही जामीन मंजूर करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

नाशिक शहरात एका नावाजलेल्या आयटी कंपनीत झालेल्या महिलांचं लैंगिक शोषण व धर्मांतरणासाठी टाकण्यात आलेल्या दबावामुळे राज्यभर तीव्र संतापाची लाट उसळली होती. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत एसआयटी स्थापन करण्याबाबतचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले होते.

ॲट्रॉसिटीचे कलम लागू

नाशिकमधील TCS कंपनीत घडलेल्या महिला लैगिंक शोषण व धर्मांतर प्रकरणात आता नवीन अपडेट समोर आली होती. याप्रकरणातील एका गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींविरोधात ॲट्रॉसिटीचे कलमही लागू करण्यात आले होते. त्यामुळे संशयितांच्या अडचणी आणखी वाढल्या होत्या.

कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात संशयितांनी पीडितेला जातीवाचक शेरेबाजी व शिवीगाळ केल्याचा प्रकार SIT च्या तपासातून समोर आलं होतं. त्यामुळे या गुन्ह्यात ॲट्रॉसिटीन्वये वाढीव कलम संशयितांविरोधात लावल्याची माहिती समोर आली होती.

SIT पथकाच्या हाती तपासादरम्यान, लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित रझा रफीक मेमन (वय ३५, रा. हरिआनंद सोसायटी, सह्याद्री हॉस्पिटलजवळ, नाशिक), शफी भिकन शेख (३६, रा. तौरा पार्क, इंदिरानगर) या दोन संशयितांच्या मोबाईलमधील आक्षेपार्ह चॅटिंग’ तांत्रिक विश्लेषणातून हाती लागले होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT