Missing Link Landslide: ‘बिनशर्त पाठिंबा’ हा लोकशाहीमधला सगळ्यात धोकादायक प्रकार...; लोकप्रिय अभिनेत्याची जळजळीत पोस्ट; निशाण्यावर राज ठाकरे?

Maharashtra Politics: एकीकडे मुंबईत पावसानं दाणादाण उडवल्यानंतर दुसरीकडे महायुती सरकारचा 'ड्रीम प्रोजेक्ट' म्हणून गाजावाजा झालेल्या आणि 1 मे रोजी धडाक्यात उद्घाटन झालेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाची दोन महिन्यांतच वाताहत पाहायला मिळाली.
Atul Kulkarni Raj Thackeray   .jpg
Atul Kulkarni Raj Thackeray .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: एकीकडे मुंबईत पावसानं दाणादाण उडवल्यानंतर दुसरीकडे महायुती सरकारचा 'ड्रीम प्रोजेक्ट' म्हणून गाजावाजा झालेल्या आणि 1 मे रोजी धडाक्यात उद्घाटन झालेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाची दोन महिन्यांतच वाताहत पाहायला मिळाली. आता मिसिंग लिंकवर काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर खड्डे पडल्याचं दिसून आलं होतं. यावरुन राजकारण तापलं असतानाच सोमवारी(ता.6 जुलै) या मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याचं समोर आलं. यानंतर सर्वच स्तरांतून या मिसिंग लिंकच्या कामावर शंका उपस्थित करण्यात येत आहेत.अशातच अभिनेता अतुल कुलकर्णी यांची पोस्ट सध्या राजकीय व चित्रपटसृष्टीत प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.

बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार हे विविध राजकीय,सामाजिक मुद्द्यांवर परखड मते मांडत असतात. यात आपल्या कसदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि तितक्याच बेधडकपणे सामाजिक तसेच राजकीय मुद्द्यांवर नेहमी बोट ठेवणाऱ्या अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावरील X प्लॅट फॉर्मवर केलेली पोस्टमधून पावसामुळे सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागत असलेल्या मनस्तापावर रोखठोक भाष्य केलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कुठेतरी अप्रत्यक्षरित्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला असल्याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे.

लोकप्रिय अभिनेते अतुल कुलकर्णी सामाजिक विषयांवर व्यक्त होत असतात. आता त्यांनी 'मिसिंग लिंक' मार्गावरील प्रवासादरम्यान आलेला अनुभव अत्यंत संतप्त आणि मार्मिक पोस्टद्वारे शेअर केली आहे. यात त्यांनी ‘बिनशर्त पाठिंबा’ खूप धोकादायक असल्याचं परखड मत व्यक्त केलं आहे.

ते सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणतात, ‘बिनशर्त पाठिंबा’ खूप धोकादायक असतो. माझा एक ‘अजेंडा’ राबवणारं सरकार आहे म्हणून त्याच्या बाकी चुकांना मी पाठीशी घालेन; हा विचार पूर्ण समाजाचा घात करणारा असतो. सदसद्विवेकबुद्धी प्रत्येकाला असते. ती गहाण टाकून सगळं ‘कोसळू’ द्यायचं का हा निर्णय ज्याचा त्याचा असल्याचं पोस्टमध्ये अभिनेता कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

Atul Kulkarni Raj Thackeray   .jpg
Missing Link Accident: मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेल्या 'मिसिंग लिंक'ची 2 महिन्यांतच वाताहत; आदित्य ठाकरेंनी सगळा राग फडणवीस-शिंदेंवर काढला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए (NDA) सरकारला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी 9 एप्रिल 2024 रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी हा निर्णय जाहीर केला होता. तसेच त्यांच्या या भूमिकेनंतर लोकसभा निवडणुकीत मनसेनं स्वतःचे उमेदवार उभे केले नव्हते.

यावेळी राज ठाकरे यांनी बाकी सारे महत्त्वाचे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात असतानाही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीच्या (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी) उमेदवारांना पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी त्यांचा हा पाठिंबा केवळ देशाच्या हितासाठी आणि "सशक्त नेतृत्वासाठी" दिला असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Atul Kulkarni Raj Thackeray   .jpg
Viral Video: "भ्रष्टाचार अन् चोरी ही व्हायलाच पाहिजे..." भर सभेत उपनगराध्यक्षांचं अजब वक्तव्य, सदस्यांना हसून आवरेना; व्हिडिओ तुफान व्हायरल

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी घेतलेल्या मोदी सरकारला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरुन मोठा राजकीय वाद पेटला होता. आता त्याच निर्णयावर अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी मुंबई किंवा राज्यात पावसानं सरकार तसेच प्रशासकीय यंत्रणांची दैना उडवल्यानंतर बोट ठेवलं की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच अतुल कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी मिसिंग लिंकवरील वैयक्तिक अनुभव शेअर केला होता. त्यात त्यांनी वैयक्तिक अनुभव शेअर करताना अतुल कुलकर्णी यांनीसुरुवातच 'भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार', अशी करत एक दृष्टिकोन मांडला आहे. सामान्यतः पैशांच्या देवाणघेवाणीलाच भ्रष्टाचार मानलं जात, परंतु नियमांचं उल्लंघन करणं हाही एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच अतुल कुलकर्णी यांनी आपल्या 27 जून 2026 च्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, काल मिसिंग लिंकच्या मोठ्या बोगद्यात आम्ही सगळे सामान्य नागरिक नियमानुसार 80 ची वेगमर्यादा पाळून जात होतो. तितक्यात कुणा सत्ताधारी व्यक्तीच्या गाड्यांचा ताफा (नेमकं कोण ते कळाले नाही, पण ते कुणीही असलं तरी फारसं वेगळं असलं असतं असं वाटत नाही) आम्हाला सायरनच्या धमक्या देत; चक्क 110, 120 च्या वेगानं तिथून निघून गेला..."

तसेच त्यांनी किती खालच्या दर्जाची भाषा वापरतात ह्या संदर्भात काही वाचत होतो. भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार. भ्रष्ट बोलणं, वागणं म्हणजे देखील ‘भ्रष्टाचारच’. की म्या पामराचं चुकतंय काही? माझ्या ह्या वक्तव्यामुळे ‘जर’ कुणा राजकारण्यांच्या भावना दुखावल्या असतील ‘तर’(च) मला क्षमा करा असा उपरोधिक टोलाही अतुल कुलकर्णी यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com