Ram Mandir News Ayodhya Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashutosh Kale : रामलल्लासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराची सेवा, सोशल मीडियावर ट्रोल...

Ram Mandir Ayodhya News : कोपरगावमधील आमदार आशुतोष काळे यांनी प्रभू श्रीरामासाठी येवला शहरात तयार करण्यात येणाऱ्या महावस्त्रात धागा विणण्याची सेवा केली.

Pradeep Pendhare

Nagar News : अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्तीची मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी (ता. २२) होत आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभर उत्सव सुरू आहे. धार्मिक स्थळाची स्वच्छता सुरू आहे. तसेच हिंदू संघटनांकडून विविध धार्मिक कार्यकार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कोपरगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार आशुतोष काळे यांनी प्रभू श्रीरामासाठी येवला शहरात तयार करण्यात येणाऱ्या महावस्त्रात धागा विणण्याची सेवा केली. मात्र, एका ठिकाणी मंदिराची प्रतिकृती स्वीकारताना काळे यांच्या एका चुकीमुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

अयोध्येतील मंदिराची प्रतिकृती पायात पादत्राणे असताना आमदार आशुतोष काळेंनी (Ashutosh Kale) स्वीकारल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर आमदार काळे यांना ट्रोल करण्यात आले.

विरोधकांकडून देखील टीका करण्यात येत आहे. तसेच हिंदू संघटनांनी देखील यावर तिखट प्रतिक्रिया सोशल मीडियावर (social media) व्यक्त केल्या आहेत. परंतु आमदार काळेंनी या टीकेकडे दुर्लक्ष करत रामभक्तीत सहभागी होत आहे. बुधवार (ता.16) त्यांनी येवला येथील कापसे फाऊंडेशनला भेट दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कापसे फाऊंडेशनला अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम (shri Ram) मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी रामलल्लाला महावस्त्र तयार करण्याची सेवा करत आहेत. रामलल्लाचे महावस्त्र तयार करण्याचे काम भक्तिभावाने केले जात आहे.

या कामात आमदार आशुतोष काळे यांनी देखील योगदान दिले. या महावस्त्राचे धागे विणण्याची माहिती घेवून स्वत: देखील महावस्त्रात धागा विणण्याची सेवा केली.

तीन महिन्यांपासून महावस्त्राचे काम...

गेल्या तीन महिन्यांपासून कापसे फाऊंडेशनमध्ये रामलल्लाचे महावस्त्र तयार करण्याचे काम सुरु असून अनेक रामभक्तांनी या ठिकाणी येऊन धागा विणण्याची सेवा दिली. रामलल्लाच्या वस्त्रात धागा विणण्याची सेवा अर्पण करण्याची संधी मिळाल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी कापसे फाऊंडेशनचे आभार मानले.

या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी रामलल्लासाठी तयार करण्यात येणाऱ्या वस्त्राचा धागा विणण्याची सेवा मिळाली हे माझे परमभाग्य आहे. कापसे फाऊंडेशनचे संस्थापक बाळकृष्ण कापसे यांच्या कापसे फाऊंडेशनला रामलल्लासाठी महावस्त्र तयार करण्याची मिळालेली सेवा ही मोठी भाग्याची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया काळे यांनी व्यक्त केली.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT