Devidas Pingale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवारांना शुभेच्छा दिल्या पण संकोच वाटला; अजित पवार गटातील 'या' नेत्याची कबुली

Sunil Balasaheb Dhumal

Nashik Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आज वाढदिवस होता. वाढदिवसादिवशी ते नाशिकमध्ये होते. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर पवारांच्या वाढदिनी अजित पवार गटात गेलेल्या क्वचितच पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्याचे दिसून आले. मात्र माजी खासदार देविदास पिंगळे हे पवारांना शुभेच्छा देण्यासाठी पोहचले. शुभेच्छा देताना संकोच वाटल्याचे त्यांनी स्पष्टपणे कबुलीही दिली.

नाशिकमध्ये असलेल्या पवारांवर रात्रीपासूनच शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. तर मंगळवारी सकाळपासूनच अनेक पदाधिकऱ्यांनी पवारांच्या निवासस्थळी गर्दी केली होती. या गर्दीत माजी खासदार पिंगळेही उपस्थित होते. दरम्यान, अजित पवार गटातील एकही पदाधिकारी नसताना पिंगळे आल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परिणामी पवारांना शुभेच्छा देताना मनात संकोच आल्याचे पिंगळेंनी खासगी वृत्तवाहिनीला सांगितले.

...म्हणून यंदा वाढदिवस नाही

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी भेट घेतली. त्यांनी पवारांसोबत केक कापला. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात मराठा आरक्षणासारखे प्रश्न आहेत. त्यामुळे शरद पवार यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिली. नाशिकनंतर पवार युवा संघर्ष यात्रेच्या समारोपासाठी नगपुरला पोहचले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक लोकसभेच्या जागेवर दावा

अजित पवार (Ajit Pawar) गटात गेलेले माजी खासदार देविदास पिंगळे यांचे बंधू गोकुळ पिंगळे हे शरद पवार गटात आहे. पवारांनी गोकुळ पिंगळे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. तेथे त्यांननी खासगीत चर्चा केली आहे. यातून पवारांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चाचपणी केल्याची चर्चा आहे. यानंतर पवारांनी नाशिक लोकसभेच्या जागेवरही दावा ठोकला आहे. यातून नाशिक जिल्ह्यात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT