NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ncp News : राष्ट्रवादीचा एक बडा नेता लोकसभेच्या तयारीत..!

Eknath Khadse willing for Raver : एकनाथ खडसे रावेरसाठी इच्छुक उमेदवार ; नवीन वर्षात राष्ट्रवादीला सर्वाधिक यश मिळावं, हाच आमचा प्रयत्न..

Amol Sutar

Ncp News : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवारांचीही धडपड सुरु झाली आहे. अद्याप कोणत्याच पक्षाची जागावाटपांबाबत ठाम चर्चा झाली नसल्याचे चित्र आहे. तसेच लोकसभेची सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखाही जाहीर नाहीत. तरी देशात आणि राज्यातही निवडणुकीची, जागावाटपाची आणि उमेदवारीची जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

दरम्यान, एका राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याबाबत जळगाव (Jalgaon) जिल्ह्याती रावेर (Raver) मतदारसंघासाठी तयारी दाखवली आहे. तसेच प्राधान्याने माझ्या नावाचा विचार करावा, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.

यावेळी खडसे म्हणाले, रावेर लोकसभेची जागा हे राष्ट्रवादीला मिळावी, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळाली तर प्राधान्याने माझ्या नावाचा विचार करावा, अशी मागणी मी सुद्धा केली आहे. पक्षाने देखील मला लढवण्याबाबत सांगितले आहे. लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी मी सुद्धा इच्छुक आहे.

पक्षाने देखील मला आदेश दिला आहे, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महायुतीने 45 जागा जिंकण्याचा दावा केला आहे. त्यावर खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीने 45 पेक्षा अधिक जागा जितू असा दावा केला बरे झाले. त्यांनी 48 जागा जिंकू असे सांगितले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तीन जागा ह्या कोणासाठी सोडल्या? आलेल्या आलेल्या सर्वेमध्ये असे दिसते. महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील. महाविकास आघाडीचा 35 ते 36 जागेवर विजय होईल असे मला वाटते, असे खडसे म्हणाले. नवीन वर्षाच्या संकल्पाबाबत बोलताना खडसे म्हणाले, पुढचे येणार नवीन वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे.

विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक यश मिळावे, हाच आमचा प्रयत्न आहे. हाच आमचा नवीन वर्षाचा संकल्प आहे, असे खडसेंनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT