Raver Loksabha Election 2024 : एकनाथ खडसेंच्या चक्रव्यूहात भाजप अडकला?

BJP v/s Eknath Khadse News : रावेर मतदारसंघात खडसे परिवारातील एकच उमेदवार असणार, यावर भाजपनेच केले शिक्कामोर्तब
Girish Mahajan & Eknath Khadse
Girish Mahajan & Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Latest Politics : भाजप आणि जळगावचे राजकारण सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या भोवती फिरत असते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. रावेर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून सुरू झालेल्या राजकारणात खडसे यांनी टाकलेल्या डावात भाजप अडकल्याचे सध्याचे चित्र आहे. (BJP found in political confussion on Raver Loksabha Constiuency)

रावेर लोकसभा (Jalgaon) मतदारसंघातून भाजपच्या (BJP) विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse)यांची उमेदवारी जवळपास रद्द समजली जाते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा धसका की, त्यांच्या दबावातून हा निर्णय झाला, याचीही एक चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Girish Mahajan & Eknath Khadse
Congress News : काँग्रेसच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक समन्वयकपदी नाशिकचे छाजेड

भारतीय जनता पक्षातील राजकारणात एकनात खडसे यांची कशी कोंडी करण्यात आली होती, हे संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले राजकारण बळकट करण्यासाठी हे केल्याचा आरोप खडसे सातत्याने करत आले आहेत. आजही गल्लीपासून तर विधिमंडळापर्यंत एकनाथ खडसे यांच्या विरोधात गिरीश महाजन असो वा पालकमंत्री गुलाबराव पाटील खडसेंवर तुटून पडतात. एकप्रकारे ते खडसेंना विरोध करता करता खडसेंच्याच जाळ्यात अडकतात, हेदेखील नाकारता येत नाही.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत जळगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांनी रावेर मतदारसंघातून उमेदवारी करावी, असे आवाहन केले होते. त्यानंतर रंगलेल्या राजकीय चर्चेत खडसे यांनी या मतदारसंघात खडसे विरुद्ध खडसे नव्हे, तर खडसे कुटुंबातील एकच उमेदवार असेल, असे स्पष्टीकरण दिले होते. या सर्व राजकारणाचा विचार केल्यास रावेर मतदारसंघात एकनाथ खडसेंनी भाजपवर टाकलेला डाव यशस्वी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दोन्ही बाजूंनी कोंडी

एकाच कुटुंबातील सदस्य एकाच वेळी सोयीनुसार सत्ताधारी व विरोधी पक्षात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, तर रक्षा खडसे भाजपमध्ये यात वेगळे काहीच नाही. खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तेव्हाच रक्षा खडसेंचा निर्णय काय असेल हे स्पष्ट झाले होते. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीसांचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी मात्र ते खूपच गांभीर्याने घेतलेले दिसते. त्यामुळे आता रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली, तरी ते अडकतात, नाही दिली तरी मतदारसंघात रक्षा खडसे यांच्यावर अन्याय झाला ही भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचारात मायलेज निश्चित आहे. काहीही झाले तरी मास्टरस्ट्रोक खडसे यांचाच ठरतो की काय? याची चर्चा आहे.

Girish Mahajan & Eknath Khadse
Maratha Reservation News : आमदार कोकाटेंच्या बालेकिल्ल्यात पसरले गावबंदीचे लोण!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com