Jalgaon Political News : तुमच्याकडे गुलाबराव.. तर मग आमच्याकडे संकटमोचक महाजन..!

Lok Sabha Constituency Election : जळगावमध्ये महायुतीचे तीन मंत्री ; मात्र, समर्थकांतच कोणता मंत्री भारी यावरून झडू लागल्या फैरी...
Girish Mahajan, Eknath Khadase, Gulabrao Patil.
Girish Mahajan, Eknath Khadase, Gulabrao Patil.Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Political News : जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या प्रत्येक पक्षाचा एक असे तीन मंत्री आहेत. एकमेकांच्या विरोधकांकडून या मंत्र्यांच्या कामकाजावर टीका केली जात आहे. आता या मंत्र्यांच्या समर्थकांतही गुलाबराव पाटील प्रभावी की गिरीश महाजन मोठे, अशी स्पर्धा लागली आहे. तुमच्याकडे गुलाबराव तर मग आमच्याकडे संकटमोचक महाजन..! असा कलगीतुरा समर्थकांमध्ये सुरू आहे. त्यांच्यात कोणता मंत्री भारी यावरून फैरी झडू लागल्या आहेत.

जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या राजकारणात महायुती विरूद्ध राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे एकनाथ खडसे (Eknath Khadase) असा राजकीय संघर्ष सातत्याने सुरू असतो. त्यात आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या समर्थकांत रस्सीखेच सुरू झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा वाद विकोपाला जाऊ नये यासाठी नेत्यांना कसरत करावी लागणार आहे.

Girish Mahajan, Eknath Khadase, Gulabrao Patil.
Manoj Jarange: ...ही सभा नसून मराठ्यांच्या पोरांची वेदना ; जरांगे सरकारवर बरसले!

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा नुकतीच केली आहे. त्यामुळे भाजप पदाधिकारी चांगलेच संतापले आहेत. यावरून जळगावमध्ये वर्चस्व कोणाचे, कोणता मंत्री भारी यावर त्यांचे समर्थक शाब्दिक वार-पलटवार करू लागले आहेत.

तर भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जळकेकर महाराज यांनी नीलेश पाटील यांना थेट आव्हान दिले आहे. ते म्हणाले, शिंदे गटाकडे गुलाबराव पाटील असल्याचा दावा ते करीत आहेत. तसे असेल तर आमच्याकडे देखील गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासारखे भक्कम नेतृत्व आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात आमचे दोन आमदार आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर आमचा अध्यक्ष होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एरंडोल, पारोळा, चाळीसगाव पालिकेवर अध्यक्ष भाजपचा होता. त्यामुळे ताकदीचा दावा शिंदे गटाने करू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. गुलाबराव पाटील जळगावचे पालकमंत्री आहेत. त्यादृष्टीने राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असली तरीही सहकारी पक्षांना साभाळण्यासाठी त्यांनी केलेली व्यवस्था त्यांचीच गैरसोय होऊ लागली आहे.

जळगाव, नाशिक दोन्हीकडे आमदार भाजपचे अन् पालकमंत्री मात्र एकनाथ शिंदे गटाचे असल्याने कार्यकर्त्यांची अनेकदा कोंडी होत असल्याचे चित्र आहे.

(Edited by Amol Sutar)

Girish Mahajan, Eknath Khadase, Gulabrao Patil.
Kolhapur Political News : आदित्य ठाकरेंप्रमाणे मुश्रीफांवर गुन्हा दाखल करा; हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com