NCP panel news : दिंडोरी बाजार समितीच्या निवडणुकीत अठरा जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत. १०७ उमेदवारांनी माघार घेतली आहे. या निवडणुकीत दोन पॅनेलची निर्मिती झाली असून दोन्ही पॅनलमध्ये सर्वपक्षीय उमेदवार आहेत. मात्र त्यात काँग्रेस पक्ष निवडणुकीपासून तटस्थ राहिल्याने निवडणूक लढविण्याचीही मानसिकता नसलेला पक्ष म्हणून तो चर्चेचा विषय आहे. (All party panels facing voters in Dindori APMC election)
या निवडणुकीमध्ये (APMC election) रंगत वाढणार असल्याचे चिन्हे दिसून आली आहे. महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) पॅनल करताना सहकारी पक्षांना न्याय देता आला नाही. त्यामुळे शिवसेनेने (Shivsena) स्वतंत्र चुल मांडली तर काँग्रेस (Congress) अलिप्त आहे.
विद्यमान सभापती दत्तात्रेय पाटील, मविप्र संचालक प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी उत्कर्ष पॅनेल तर माजी आमदार रामदास चारोस्कर, सहकार नेते सुरेश डोखळे, भाऊलाल तांबडे, नरेंद्र जाधव, विलास कड, शहाजी सोमवंशी, प्रकाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनेलची निर्मित्ती झाली आहे. १८ जागांसाठी ४२ उमेदवारांनी नशिब अजमावण्याचा प्रयत्न केला आहे.
पॅनेलची निर्मित्ती होत असताना दोन्ही पॅनेलमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांचा समावेश असल्याने या निवडणुकीत पक्षिय हेवेदावे बाजूला ठेऊन विचाराने एकत्र येऊन या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. शेतकरी उत्कर्ष पॅनेलतर्फे केलेल्या विकासावर मतदारांपर्यंत पोहचत मते मागण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिवर्तन पॅनेलनेही वैयक्तिक टिकाटिपणी करण्यापेक्षा संधी दिल्यास त्याचे सोने करून बाजार समितीचा विकास करून दाखवण्याचा विश्वास मतदारांना देण्याचा निर्धार केला आहे.
शेतकरी उत्कर्ष पॅनेल उमेदवार
शेतकरी उत्कर्ष पॅनेलचे उमेदवार असे, दत्तात्रेय रामचंद्र पाटील, चंद्रशेखर हिंमतराव देशमुख, शिवाजी बाबूराव पिंगळ, अनिल सुदामराव देशमुख, रघुनाथ राजाराम मोरे, विलास दिनकर निरघुडे, प्रवीण चंद्रभान संधान. इतरमागास प्रवर्ग- प्रवीण एकनाथ जाधव, वि. जा. भ. ज.- शाम गणपत बोडके, महिला राखीव-सत्यभामा साहेबराव हिरे, विमल गुलाब जाधव. सर्वसाधारण - वसंत रामभाऊ जाधव, नरेंद्र सुभाष पेलमहाले, अनु. जा. जमाती- पांडूरंग काळू टोंगारे, ग्रामपंचायत- पंडित महादू बागूल, हमाल तोलारी संघ -सुधाकर प्रभाकर जाधव.
परिवर्तन पॅनलचे उमेदवार
परिवर्तन पॅनलचे उमेदवार असे, प्रशांत प्रकाश कड, कैलास बाबूराव मवाळ, गंगाधर खंडेराव निखाडे, नरेंद्र कोंडाजी जाधव, पांडूरंग निवृत्ती गडकरी, रतन रामदास बस्ते. बाळासाहेब विश्वनाथ पाटील. इतर मागास प्रवर्ग-दशरथ शिवाजी उफाडे, वि. जा. भ. ज.- प्रवीण वसंत केदार. महिला राखीव- रचना अविनाश जाधव, अर्चना अरुण अपसुंदे. ग्रामपंचायत- योगेश माधवराव बर्डे, दत्तू नामदेव भेरे. अनु. जा. जमाती- दत्ता पांडुरंग शिंगाडे. आर्थिक दुर्बल- दत्तू चिंतामण राऊत. हमाल तोलारी संघ- विजय मुरलीधर गोतरण.
काँग्रेसची भूमिका तटस्थ
काँग्रेसला विचारात घेऊन सत्ताधारी पॅनेलने पॅनेलची निर्मित्ती केली नाही, त्यामुळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पिंगळ यांनी अर्ज माघार घेत काँग्रेस या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेत असल्याचे जाहीर केले. लवकरच कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्षाची भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचे सुनील आव्हाड, वाळू जगताप यांच्या उपस्थितीत पिंगळ यांनी भूमिका मांडली. परंतु दिंडोरी शहराध्यक्ष गुलाब जाधव यांच्या पत्नी विमल जाधव यांनी शेतकरी उत्कर्ष पॅनेलकडून उमेदवारी करीत असल्याने काँग्रेसची आगामी भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.