APMC election News : महाविकास आघाडीत बिघाडी तरीही भाजपची सगळीकडे पिछाडी!

नाशिक जिल्ह्यात २२३ जागांसाठी एकूण ५३७ उमेदवार रिंगणात मात्र आघाडीत झाली बिघाडी.
Chhagan Bhujbal & Girish Mahajan
Chhagan Bhujbal & Girish MahajanSarkarnama

BJP missed the APMC election : राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाविरोधात वज्रमूठ बांधणाऱ्या महाविकास आघाडीत मात्र नाशिक जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्ताने बिघाडी झाली. अनेक बाजार समित्यांमध्ये गटा-गटात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्या तुलनेत शिंदे गट आणि भाजपने पॅनल रिंगणात उतरवले आहे. मात्र लासलगाव, देवळा, चांदवड वगळता भाजपला प्रभावी आव्हान देता आले नाही. त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुकीत भाजपने संधी गमावल्याचे चित्र आहे. (Mahavikas Aghadi not able keep unity in APMC election)

बाजार समित्यांच्या निवडणुकीत (APMC election) अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यामुळे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांत बिघाडी झाली. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेत (Shivsena) सामना होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली.

Chhagan Bhujbal & Girish Mahajan
Pachora News : शिंदे गटाचे आमदार म्हणाले, उद्धव ठाकरेंचे स्वागतच करू!

मनमाड बाजार समितीत ठाकरे व शिंदे गटातील समर्थकांमध्ये हाणामारी झाली. सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी थेट शिवसेनेच्या ठाकरे गटात उडी घेतली. सुरगाणा बाजार समितीत माकपने चमत्कार दाखवत सर्व १८ जागा बिनविरोध केल्या. देवळा बाजार समितीत आठ आणि नाशिकमध्ये तीन जागा बिनविरोध झाल्याने पॅनलच्या विजयाचा श्रीगणेशा झाला. मनधरणी करता-करता अनेक ठिकाणी अपक्ष रिंगणात राहून गेल्याने तेदेखील आता नशीब अजमावीत आहेत.

जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांमध्ये गुरुवारी (ता.२०) माघारी झाल्यानंतर २२३ जागांसाठी ५३७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. दाखल झालेल्या दोन हजार २७७ उमेदवारांपैकी एक हजार ५९८ उमेदवारांनी माघार घेतली आहे. माघारी प्रक्रिया झाल्यानंतर साधारण सर्व बाजार समित्यांमध्ये नेत्यांनी पॅनलची घोषणा करत निवडणुकांचे रणशिंग फुकंले. बहुतांश बाजार समित्यांमध्ये दुरंगी लढती होत आहे. दोन वर्षांपासून रखडलेल्या बाजार समित्यांच्या रणधुमाळीत यंदा कधी नव्हे, ते विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

Chhagan Bhujbal & Girish Mahajan
Sinnar APMC election News : माणिकराव कोकाटे विरूद्ध राजाभाऊ वाजे लढत!

जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांमधील २५२ जागांसाठी विक्रमी दोन हजार ४२० अर्ज प्राप्त झाले होते. यात सोसायटी गटात एक हजार ४६१, ग्रामपंचायत गटात ६७८, व्यापारी गटात १८३, हमाल-मापारी गटातील ९८ अर्जांचा समावेश होता. छाननी प्रक्रियेनंतर दोन हजार २७७ उमेदवार रिंगणात होते. यापैकी गुरुवारी एक हजार ५९८ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे ५३७ उमेदवार रिंगणात आहेत.

भाजपविरोधात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करत, तसे फर्मानच जिल्ह्याला देण्यात आले होते. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट-भाजप अशी लढत होईल, असे मानले जात होते. प्रत्यक्षात, माघारीनंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना स्थानिक हेवेदाव्यामुळे गटागटांत विभागली गेली. पिंपळगाव बाजार समितीत राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर विरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम व गोकुळ गिते यांच्या पॅनलमध्ये लढत होत आहे.

Chhagan Bhujbal & Girish Mahajan
Nashik APMC News: देविदास पिंगळेंची विरोधकांवर मात, ३ संचालक बिनविरोध!

सिन्नर बाजार समितीत राष्ट्रवादीचे आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी पॅनल उतरविला आहे. येथे राष्ट्रवादी अंतर्गत झालेल्या गटबाजीमुळे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी थेट ठाकरेंच्या शिवसेना गटात प्रवेश केला.

मालेगाव बाजार समितीत पालकमंत्री दादा भुसे यांचे पॅनल व माजी संचालक अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये सरळ-सरळ लढत होत आहे. नाशिक बाजार समितीत व्यापारी व हमाल मापाडी अशा तीन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित जागांसाठी माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या आपला पॅनल व माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या शेतकरी विकास पॅनलमध्ये लढत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com