Devidas Pingle group news : माघारीच्या शेवटच्या दिवशी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गटातील ११ पैकी ९ उमेदवारांनी माघार घेतल्याने पिंगळे गटाचे जगदीश अपसुंदे, संदीप पाटील हे दोन उमेदवार बिनविरोध झाले आहे. त्यातून देविदास पिंगळे यांनी विरोधकांवर प्रारंभीच्या लढाईत आघाडी घेतली आहे. (NCP leader Devidas Pingle takes a lead on BJP panel)
नाशिक (Nashik) बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC election) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी खासदार देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांनी काल आपले पॅनल जाहीर केले. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे (Shivsena) शिवाजी चुंभळे आणि भाजपचे (BJP) दिनकर पाटील यांनी पॅनल केले आहे. १५ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात आहेत.
यापूर्वी हमाल मापारी गटातून चंद्रकांत निकम हे बिनविरोध झाले असून, आता व्यापारी गटातूनही दोन उमेदवार बिनविरोध झाल्याने पिंगळे गटाची सरशी झाली आहे. आता बाजार समिती निवडणुकीच्या रिंगणात १५ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात असून, एकूण ९७ उमेदवारांनी माघार घेतली.
या निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजप - शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट लढत होणार आहे. गुरुवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. पिंगळे व चुंभळे गटाच्या उमेदवार तसेच पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यात, व्यापारी गटात ११ उमेदवार होते, यातील ९ उमेदवारांनी माघार घेतल्याने व्यापारी गटाची निवडणूक बिनविरोध झाली.
पिंगळे यांचे उमेदवार
देवीदास पिंगळे, संपत सकाळे, बहिरू मुळाणे, युवराज कोठुळे, तुकाराम पेखळे, उत्तम आहेर, उत्तम खांडबहाले यांना सोसायटी सर्वसाधारण गटातून तर दिलीप थेटे यांनी सोसायटी इतर मागासवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर विश्वास नागरे यांनी सोसायटी वि.जा.भ.ज. तर सविता संजय तुंगार, विजया कांडेकर यांनी सोसायटी महिला गटातून उमेदवारी अर्ज भरला आहे. तसेच, जगन्नाथ कटाळे, विनायक माळेकर यांनी ग्रामपंचायत सर्वसाधारण गटामधून तर निर्मला कड यांनी ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गट, भास्कर गावित यांनी ग्रामपंचायत अनु. जाती-जमाती गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सहकारी संस्थेचा मतदारसंघ अकरा पैकी सर्वसाधारण (७), महिला राखीव (२), इतर मागास वर्गीय (१), विमुक्त जाती विमुक्त जमाती (१) यात एकूण २६ उमेदवार तर ग्रामपंचायत मतदार संघ चारपैकी सर्वसाधारण (२), अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (१), आर्थिक दुर्बल घटक (१) यात एकूण अकरा उमेदवार असे एकूण ३७ उमेदवार रिंगणात आहेत.
पिंगळे गटाच्या तीन जागा बिनविरोध
व्यापारी गटातून माजी संचालक जगदीश अपसुंदे व संदीप पाटील हे बिनविरोध निवडीसाठी प्रयत्नशील होते. गुरुवारी (ता.२०) अर्ज माघारी चा श्रीगणेशा हा माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी केला. त्यांनतर शिंदे, पाटील , मोराडे , शिंदे, नलावडे, आल्हाटे, बोडके व अखेरच्या क्षणाला माजी नगरसेवक शरद सानप यांनी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. निवडणुकीत पिंगळे गटाने सरशी घेत १८ पैकी ३ जागा बिनविरोध करत विजयाचा श्रीगणेशा केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.