Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse On Trible : संतापलेल्या खडसेंनी राज्यकर्त्यांची लाजच काढली!

Sampat Devgire

Trible issue seviour in Maharashtra : महाराष्ट्रातील सर्वाधीक कुपोषण व कुमारी मातांचा मृत्यू नंदूरबार जिल्ह्यात झाले आहेत. त्यांचा काय गुन्हा होता. त्यांचा निधी का वळवला जातो?. त्यावर आपण चर्चा का टाळतो, त्यावर हसतो. हा हसण्याचा विषय आहे काय?. सत्ताधाऱ्यांना याची लाज वाटत नाही का?, असा संतप्त सवाल एकनाथ खडसे यांनी केला. (Eknath Khadse questioned government on Trible Child mortality and malnutrition of Maharashtra)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) एकनाथ खडसे (Eknath Khadse) आज विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते. यावेळी त्यांनी आदिवासींच्या (Trible) प्रश्नावर सरकार धारेवर धरले.

यावेळी श्री. खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, कंत्राटदारांचे घोटाळे, गुन्हेगारी यांसह विविध प्रश्नांवर त्यांनी सरकारला गंभीर प्रश्न केले.

यावेळी ते आदिवासींच्या प्रश्नांवर बोलत असताना तालीका सभापती नरेंद्र दराडे यांनी त्यांना वेळेचे कारण देत हटकले. सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांनी त्यांना प्रश्न करीत हसल्याने श्री. खडसे संतापले. कुपोषण, बालमृत्यू, बाल मातांचा मृत्यू या विषयावर ते अत्यंत गंभीर माहिती देत असताना हे घडले.

या अडथळ्यांमुळे खडसे संतापले, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि सत्ताधारी सदस्यांना लक्ष्य करीत, आदिवासींच्या गंभीर प्रश्नावर चर्चा होताना तुम्ही हसता. हा हसण्याचा विषय आहे काय?. त्या आदिवासींचा काय दोष आहे?. त्यांच्या हाती असते तर त्यांनी ब्रम्हदेवाकडे मागणी केली असती, की आम्हाला नंदुरबारला, मेळघाटला, ठाण्यात अन् महाराष्ट्रात तर बिलकूलच जन्माला घालू नको. यावेळी खडसे यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या.

आदिवासी विभागाला लोकसंख्येच्या प्रामणात ९ टक्के निधी राखीव असतो. तो पूर्ण निधी त्यांच्यावर खर्च होतो का?. त्यातील १२९३ कोटी रुपये यंदा आपण अन्यत्र वळवले. हे का वळवले?. आदिवासींच्या किती समस्या तुम्ही सोडवल्या?. त्यावर राज्य सरकार गंभीर होईल की नाही? असा प्रश्न त्यांनी केला. यावेळी शिवसेनेचे आमषा पाडवी यांनी आपला वेळ खडसे यांना बोलण्यासाठी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT