Ambadas Danve : केंद्राकडून निधी देताना `युपी`वर मेहेर तर महाराष्ट्रावर अन्याय!

Whether State Government have courage to talk against Centre-केंद्र सरकारने १५ व्या वित्त आयोगात उत्तर प्रदेशला १८ टक्के तर महाराष्ट्राला अवघा ७ टक्के निधी देऊन अन्याय केला.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Centre cut Funds : देशाच्या `जीडीपी` मध्ये महाराष्ट्राचा वाटा १४ टक्के आहे. मात्र केंद्र सरकारने अवघा ७ टक्के निधी दिला. मात्र उत्तर प्रदेशचा वाटा ८ टक्के असताना त्यांना १८ टक्के निधी दिला. महाराष्ट्रावर केंद्र सरकारने अन्याय केला आहे. त्याविरोधात बोलण्याची हिम्मत सध्याचे सत्ताधारी हिंमत करतील का?, हिंमत केलीच तर कोणी ऐकेल का अशी स्थिती आहे?. (Centre Government made injustice with Maharashtra sate in Funds allocation)

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्य सरकारचा (Maharashtra) आर्थिक गलथानपणा, गोंधळ पाहता राज्य कर्जाच्या विळख्यात आणि आर्थिक संकटात अडकले आहे, असा गंभीर आरोप केला.

Ambadas Danve
NCP-BJP News : अजित पवार गटाचा बडा नेता म्हणतो, ‘मतदारसंघातील अवैध धंद्यांना पोलिसांचे संरक्षण’

विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चर्चेला प्रारंभ केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या घोषणा, प्रत्यक्ष कृती व वास्तव यावर प्रकाशझोत टाकला.

ते म्हणाले, राज्यावर सध्या सात लाख ७ हजार ४७२ कोटींचे कर्ज आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येकावर ५६,८०० कर्जाचा हा बोजा आहे. राज्यात जन्माला येणारे प्रत्येक बाळ एव्हढे कर्ज घेऊन जन्माला येते. ११.२० टक्के महसूल त्याचे व्याज अदा करण्यात खर्च होते. गेल्या तेरा महिन्यातील सरकारच्या कार्यकाळ व कारभाराचा परिणाम म्हणून आर्थिक घडी बिघडली आहे. त्याचे प्रतिकूल परिणाम होत आहेत.

Ambadas Danve
Raj Thackeray Favorite Reel Star: राज ठाकरेंचा आवडता रील्स् स्टार कोण ?

सरकारने अनेक मोठ्या मोठ्या घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री कसे काम करीत आहेत, ते पहावे. सामाजिक न्याय विभागाचे बजेट १४,७३४ कोटींनी कमी करून मागासवर्गीयांचा निधी त्यांनी काढून घेतला.

राज्याचा स्वाभीमान केंद्र शासनाकडून दाबला जातोय, ठेचला जातोय, स्वाभीमान दुखावला जातो आहे, यावर सत्तादारी, प्रशासन काहीच बोलणार नाही. बोलले तरी त्यांचे ऐकणार कोण?. त्यामुळे घोषणा होतात, मात्र जनतेला मिळत काहीच नाही.

Ambadas Danve
NCP-BJP News : अजित पवार गटाचा बडा नेता म्हणतो, ‘मतदारसंघातील अवैध धंद्यांना पोलिसांचे संरक्षण’

श्री दानवे यांनी आर्थिक विषयावर राज्य सरकारला आरसा दाखवताना, राज्याला योग्य निधी मिळत नाही. महाराष्ट्राला ३४ हजार कोटी तर उत्तर प्रदेशला १ लाख ८३ हजार ८६० कोटी केंद्र सरकारने निधी दिला. यामध्ये आपण सपशेल अपयशी ठरलो आहेत. याबाबत राज्याच्या सन्मानासाठी काम केव्हा करणार, असा सवाल त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com