Ahmednagar News : नगर तालुक्यातील घोसपुरी जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा जनआधार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे चांगलेच आक्रमक झाले. निकृष्ट दर्जाच्या कामाच्या तक्रार करून देखील त्याची पाहणी करण्यासाठी टाळाटाळ अधिकारी करत असल्याचा आरोप करत त्यांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नगर कार्यालयाला टाळे ठोकले. अचानक केलेल्या या आंदोलनामुळे कार्यालयातील अधिकाऱ्यांची त्रेधा उडाली.
नगर(Ahmednagar) तालुक्यातील घोसपुरी जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे गेल्या सहा महिन्यांपासून काम सुरू आहे. या योजनेद्वारे 15 गावांना पाणीपुरवठा होणार आहे. या कामांमध्ये सात नवीन पाण्यांच्या टाक्याचे व मोठ्या प्रमाणात नवीन पाईपलाईनचे काम चालू आहे. सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत जनआधार संघटनेच्यावतीने प्रकाश पोटे यांनी तक्रार केली होती.
त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या हजेरीत घोसपुरी योजनेत समाविष्ट असलेल्या बाबुर्डी घुमट येथील पाईपलाईन कामाची तपासणी करण्यात आली. येथे खोदून तपासणी केली असताना पाईपलाईन एक ते दीड फुटावरच गाडल्याचा आढळले.(NCP)
या योजनेसाठी 50 कोटी रुपयांच्या निधी मंजूर झाला आहे. परंतु ठेकेदार पैसा वाचवण्याच्या हेतून अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाईपलाईनचे काम निकृष्टपद्धतीने करत आहे. या ठेकेदाराला दहा टक्के बिल देखील अदा झाले आहे. या कामाची चौकशीकडे प्रकाश पोटे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पत्रव्यवहार करत आहेत. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नगर कार्यालयाचे अधीक्षक अभियंता एस. एम. मोरे यांना देखील निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. पाईपलाईनच्या कामाच्या चौकशीसाठी चाचणी घेण्याची मागणी केली होती. चौकशी न झाल्यास आंदोलन करून अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता.
या सर्व मुद्यांवर प्रकाश पोटे आणि त्यांचे सहकारी पदाधिकारी आज अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. परंतु अधिकारी भेटत नसल्याने प्रकाश पोटे यांनी आक्रमक होत, कार्यालयाला टाळे ठोकले. शेखर पंचमुख, योगेश भालेराव, भीमा कराळे, दीपक गुगळे, अमित गांधी, निलेश सातपुते हे यावेळी उपस्थित होते. प्रकाश पोटे यांनी कार्यालयाला टाळे ठोकल्यामुळे इतर अधिकाऱ्यांची धावपळ झाली.
पुढील आठ दिवसात ट्रायल पीठ खड्ड्याची चाचणी करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना काळे फासू, असा इशारा प्रकाश पोटे यांनी यावेळी दिला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.