Lok Sabha Election 2024  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar South Election 2024: 'राष्ट्रवादी'च्या हरकतीची हवाच निघाली; PM मोदींच्या सभेचा खर्च,महायुतीनं लढवली शक्कल

Sujay Vikhe Patil Vs Nilesh Lanke News : नगर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार सुजय विखेंचा 54 लाख 60 हजार 453 रुपये तर, महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंकेंचा खर्च 31 लाख 4 हजार 697 रुपये खर्च प्रचारावर झाला आहे.

Pradeep Pendhare

Nagar South Election News : नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान झाले. या दोन्ही मतदारसंघातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा निवडणूक खर्च समोर आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नगरमधील सभेचा खर्चावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने हरकत घेतली आहे. हा खर्च महायुतीचे शिर्डी आणि नगर दक्षिणमधील उमेदवारांनी विभागून दाखवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने घेतलेल्या हरकतीची हवाच निघून गेली.

नगर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखेंचा आठ मे रोजीपर्यंत 54 लाख 60 हजार 453 रुपये तर, महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंकेंचा खर्च 31 लाख 4 हजार 697 रुपये खर्च प्रचारावर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेवर 39 लाख रुपये खर्च झाला आहे. हा खर्च शिर्डीचे शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे आणि नगर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांनी विभागून दाखवला आहे. वंचितचे उमेदवार दिलीप खेडकर यांनी खर्च सादर केलेला नाही. ते खर्च सादर करण्यासाठी अनुपस्थित होते. त्यांनी खर्च सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे.

महायुती भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी 22 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी नगरमध्ये उपस्थित होते. या दिवशी उमेदवार विखे यांचा प्रचाराचा खर्च पाच लाख 38 लाख रुपये खर्च झाला आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंकेंनी अगदी साध्यापद्धीतने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या दिवसाचा खर्च नीलेश लंकेंनी 29 हजार 920 रुपये दाखवला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार यांच्या नीलेश लंकेंच्या (Nilesh Lanke) प्रचारासाठी नगरमध्ये चार सभा झाल्या. नगर, श्रीगोंदे, शेवगाव आणि राहुरी येथे या चार सभा झाल्या. या चारही सभांचा खर्च 12 लाख 34 हजार 225 रुपये दाखवला आहे. शरद पवार यांची राहुरीतील सभा सर्वाधिक महागडी ठरली. या सभेवर 6 लाख 28 हजार 250 रुपये खर्च झाला आहे.

या निवडणुकीत खर्चाची मर्यादा 95 लाख रुपये होती. दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाचा ताळमेळ निवडणूक खर्च निरीक्षकांनी तपासलेला आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर 25 उमेदवारांचा निवडणुकीतील प्रचारखर्च जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक निकाल चार जूननंतर 26 दिवसांच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करावा लागणार आहे. यासाठी निवडणूक खर्च निरीक्षक पुन्हा एकदा नगरमध्ये येऊन त्याचा आढावा घेतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT