Vijay Wadettiwar : सत्तापिपासून भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय? विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल

BJP : महायुतीचे पाप लपविण्यासाठी भावेश भिडे नावाच्या व्यक्तीचे फोटो समोर आणले आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

Mumbai Political News : दोन दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये होर्डींग पडून झालेल्या दुर्घटनेत 18 पेक्षा अधिक लोकांचे प्राण गेले. होर्डिंग हटवण्याचे काम आज (बुधवारी) देखील सुरु होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रचारासाठी मुंबईमध्ये आहेत. ते घाटकोपरमध्ये रॅली काढणार आहेत. याच मुद्यावरून विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

'मुंबईमधील होर्डिंग दुर्घटना स्थळाजवळून पंतप्रधानांची रॅली भाजप BJP काढत आहे.भ्रष्ट महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे आणि धोरणांमुळे या दुर्घटनेत 18 निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे. तरी देखील भाजपाच्या रॅली, रोड शो थांबत नाहीत.सत्तापिपासू भाजपाचा संवेदनशिलपणा संपला आहे. खरतर ही घटना घडल्यानंतर भाजपने रॅली रद्द करायला हवी होती. पण भाजपाला रॅली काढून आनंद मिळताना दिसतोय.' अशा शब्दांत विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Vijay Wadettiwar
Lok Sabha Election 2024: आंबेडकरांच्या 'त्या' आवाहनाविरोधात आठवलेंचा एल्गार, म्हणाले, "बाबासाहेबांचे स्वप्न ..."

भाजपचाच डाव

होर्डिंग दुर्घटनेनंतर होर्डिंग संबधित असलेल्या भावेश भिडे याचे फोटो माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या सोबत असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. त्यावरून देखील वडेट्टीवारांनी भाजपला सुनावले. जी क्रेन घटनास्थळी लवकर जायला हवी होती ती काल गेली.आता महायुतीचे पाप लपविण्यासाठी भावेश भिडे नावाच्या व्यक्तीचे फोटो समोर आणले आहेत. कोणाचे फोटो कोणासोबत असू शकतात त्यामुळे काही फरक पडणार नाही. प्रतिमा मलिन करण्याचा भाजपाचा जुना डाव आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप घाबरत आहे

वडेट्टीवार म्हणाले, आज मुंबईत मोदींचा रोड शो होतोय आणि राज्यात 24 वी सभा घेतली जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा एखादा नेता एवढ्या सभा घेत नाही. तेवढ्या सभा या राज्यात मोदी घेत आहेत. याचा अर्थ असा आहे की, राहूल गांधी यांची मोदींना भिती वाटते. महाविकास आघाडी 35 जाग जिंकणार आहे. त्यामुळे भाजपा घाबरली आहे.

प्रफुल पटेलांना सुनावले

प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिरेटोप घातला. त्यावरून वडेट्टीवारांनी सुनावले. पंतप्रधानांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घातला. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. जिरेटोप फक्त शिवाजी महाराजांच्या डोक्यावर शोभतो. महाराष्ट्रच्या अस्मितेची जाण प्रफुल्ल पटेल यांना नाही.ज्या प्रफुल पटेलांवर दहशवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप भाजपाने केले होते त्यांच्या हातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिरेटोप कसा परिधान केला ? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

Vijay Wadettiwar
Chhagan Bhujbal News: भुजबळ यांनी भाजपला सुनावले, म्हणाले, कांद्याचा किमान खर्च द्यावा !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com