Sujay Vikhe - Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanka On Sujay Vikhe Patil : खोटं बोल पण रेटून बोल, ही तर त्यांची सवय !

Ahmednagar Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी नाव न घेता खासदार सुजय विखे यांच्यावर केले जोरदार प्रहार...

Pradeep Pendhare

nagar News : राहुरी येथील सभेत महाविकास आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांनी खासदार सुजय विखे यांचे नाव न घेता केंद्राकडून शेती, शेतकरी उत्पादकांना दिलासा न दिल्यावरून जोरदार प्रहार केले. खोटं बोल पण रेटून बोल,अशी विरोधकाची स्थिती आहे. कांदा निर्यात बंदी प्रत्यक्षात झालेली नसताना देखील निर्यात बंदीचे श्रेय घेण्याचा केलेल्या केविलवाणा प्रयत्नावर देखील नीलेश लंकेंनी जोरदार टीका केली.

राहुरी येथील सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुमलेबाजीवर,तर मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता त्यांच्या श्रेयवादी राजकारणावर जोरदार टीका केली. शरद पवार यांच्या पाठोपाठ उमेदवारी माजी आमदार नीलेश लंके यांनी देखील विखे यांचे नाव न घेता शेती आणि शेतीशी निगडीत समस्या तशाच ठेवल्यावरून जोरदार प्रहार केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नीलेश लंके म्हणाले, 'खोटं बल पण रेटून बोल, ही विरोधकाची सवय आहे'. कांदा निर्यात बंदी प्रत्यक्षात झाली नव्हती. तरी देखील निर्यात बंदीचे श्रेय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज शेतीमालाला भाव नाही. शेतकरी (FARMER) आत्महत्या करतो. त्या वाढल्या आहेत. दूध दर ढासळले आहेत. यावर उपाययोजना होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी तसा केंद्राकडे प्रयत्न करत नाही. तसे मुद्दे मांडत नाही. उलट आम्ही सुपा एमआयडीसीचा वेगाने केलेल्या विकासावर अपप्रचार करण्यात धन्यता मनतो आहे".

गुंडगिरी केली असती तर औद्योगिक विकास झाला असता काय? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपण संसद (LOKSABHA) भवन गाजवू. आपल्याला एक संधी द्या. आपली काॅलर अभिमानाने ताठ होईल, असे काम आपण करून दाखवून, असे राहुरीतील जनतेला नीलेश लंके यांनी शब्द दिला.आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव, करणी सेनेचे अध्यक्ष नीलेश जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू, सभापती अरुण तनपुरे,मच्छिंद्र सोनवणे, बाळासाहेब आढाव, संदीप वर्पे, रावसाहेब म्हस्के, धनराज गाडे उपस्थित होते.

चांगल्या संस्था बंद पाडण्याचा यांचा धंदा

विरोधकांनी खरे तर विकासकामांवर निवडणूक लढवली पाहिजे. पण विकासावर बोलण्यासारखे त्यांचेकडे काहीच नाही. चांगल्या संस्था हे बंद पाडतात. गणेश पाठोपाठ राहुरी कारखाना बंद पाडला. राहुरीचे इंजिनिअरिंग काॅलेज यांनी बंद पाडले. धनशक्ती विरोधी जनशक्ती, अशी ही लढाई आहे. त्यामुळे यात जनतेने गाफिल राहू नये. यांना नगर जिल्ह्यात साधे शासकीय मेडिकल काॅलेज आणता आले नाही. नगर-मनमाड महामार्ग वेळेवर चांगला केला नाही. त्यामुळे पाचशे बळी गेले. आपण कामातून पुढे आलो आहोत. कोविड काळात 33 हजार रुग्ण बरे केले. मी माणसांवर प्रेम करणारा आहे. सत्ता संपत्तीवर नाही, असेही नीलेश लंके यांनी म्हटले.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT