Ahmednagar News : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीला समोरे जाताना जाहीरनामा 'न्यायपत्र' म्हणून सादर केले आहे. काँग्रेसच्या न्यायपत्राचे समाज माध्यमांवर कौतुक होत असतानाच भाजपने मात्र त्यावर हल्ला चढवला आहे. "काँग्रेसचे न्यायपत्र हे ब्रिटिश काळात 1936 मध्ये मुस्लिम लीगने जो जाहीरनामा सादर केला होता, त्याच्यात आणि आता काँग्रेसने केलेल्या जाहीरनाम्यात काहीच फरक नाही. मुस्लिम लीगच्या त्या जाहीरनाम्यानंतर 1940 मध्ये फाळणीची बीजे रोवली गेली. त्यामुळे आता मुस्लिम तुष्टीकरणाची भूमिक घेऊन काँग्रेस देशाला दुसर्या फाळणीकडे नेत आहे", असा गंभीर आरोपदेखील लक्ष्मण सावजी यांनी केला.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे प्रचाराचा आढावा प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी नगरमध्ये बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. भाजप प्रदेश कामगार मोर्चाचे सरचिटणीस विक्रम नागरे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा, महेश नामदे, नितीन शेलार, आनंदा शेळके, बंटी डापसे उपस्थित होते. (Lok Sabha Election 2024)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, अशा आशयाचे काँग्रेसचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे 2006 मधील विधान होते व त्याअनुषंगाने काँग्रेसने त्यांच्या आताच्या जाहीरनाम्यात मुस्लिम तुष्टीकरणाची भूमिका घेतल्याचा दावा', लक्ष्मण सावजी यांनी केला. बहुसंख्याक तसेच दीनदलितांची संपत्ती मुस्लिमांना देणे आणि त्यांचे लांगुलचालन करण्याचा विचार म्हणजे लोकांकडील अतिरिक्त संपत्ती काढून घेण्याची ही मूळ विचारसरणी माओवादी-नक्षलवाद्यांची आहे. ती काँग्रेस प्रत्यक्षात आणू पाहात आहे, असा आरोपही सावजी यांनी केला. त्यामुळे काँग्रेस व महाविकास आघाडीला मत म्हणजे देशाच्या फाळणीला मत असेल, असेही वादग्रस्त विधान त्यांनी केले.
राहुल गांधी (Rahul Gandhi) स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काहीही बोलतात. जाहीरनाम्यातून अल्पसंख्याकांना झुकते माप देण्याचा विचार काँग्रेस मांडते. यातून काँग्रेस समाजात दुही माजवून दोन समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत असले तरी भाजप ते यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा लक्ष्मण सावजी यांनी म्हटले.
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनीही वारसा हक्काची 55 टक्के संपत्ती सरकारला देण्याची भूमिका मांडली आहे. पण त्यांनी आधी रॉबर्ट वाड्रा यांची वारसा हक्काने आलेली संपत्ती सरकारजमा करावी, असे आव्हान दिले. काँग्रेसने 70 वर्षे देशाला लुटले आहे व आता त्यागाची भाषा करीत आहे. पण देशाप्रती कर्तव्य बजावण्यास अनेक मार्ग आहेत, असेही सावजी यांनी आवर्जून स्पष्ट केले. दरम्यान, महायुतीतील अजित पवार गटाने जाहीरनाम्यात जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडला असून, अशा सर्वेक्षणास भाजप (BJP) तयार असल्याचेही स्पष्टीकरण लक्ष्मण सावजी यांनी दिले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.