Ahilyanagar news : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. लंकेंनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कट्टर समर्थक उमेदवाराला पराभूत करत जिल्हा बँकेत एन्ट्री केली आहे. विखे पाटील, बाळासाहेब थोरात हे एकत्र येऊनही विजय झाल्याने लंकेंच्या अंगात जणू शंभर हत्तींचे बळ आले आहे.
खासदार लंके यांनी या निवडणुकीत २४ मतांनी विजय मिळवत राहुल शिंदे यांना पराभूत केले आहे. हा विजय त्यांच्यासाठी महत्वाचा मानला जात आहे. लंके यांना सर्वच विरोधकांनी घेरले होते. दोन कट्टर राजकीय विरोधक एकत्र आले होते. त्यामुळे त्यांचा विजय होणार की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या विजयानंतर लंकेंची पहिली प्रतिक्रिया समोर आहे.
लंकेंनी सोशल मीडियात पोस्ट करत थेट विखे पाटील आणि थोरांतांना डिवचले आहे. त्यांनी म्हटले आहे की, असतील तुमच्याकडे करोडो रुपयांचे कारखाने… शिक्षणसंस्था, गडगंज संपत्ती… पण माझ्याकडे तुमच्या पैशाने सुद्धा विकत ना घेऊ शकणारी कोहिनूर माणसे आहेत, अशा शब्दांत लंकेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांचा पराभव करत लंकेंनी जोरदार दणका दिला होता. आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही मोठे आव्हान मोडून काढत त्यांनी विजयश्री खेचून आणली आहे. लंकेंनी आपल्या पक्षाचे पॅनेल या निवडणुकीत उतरवत बलाढ्य विखे पाटील-थोरातांसमोर आव्हान उभे केले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावमधील आमदार आशुतोष काळे यांनी विजयाचे खाते उघडले आहे. शेतीपूरक मतदारसंघातून आमदार काळे विजयी झाले असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुधीर म्हस्के यांचा पराभव केला आहे. काळे यांचा तब्बल ६२६ मतांनी विजय झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.