Ruhullah Mehdi resignation : इंडिया आघाडीला झटका, नेत्याची खासदारकीच्या राजीनाम्याची घोषणा; पक्षालाही ठोकला रामराम

Aga Syed Ruhullah Mehdi, National Conference MP : पक्षाने निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांबाबत सत्तेत आल्यानंतर पाठ फिरविल्याचा आरोप खासदार मेहदी यांनी केला आहे.
Aga Syed Ruhullah Mehdi
Aga Syed Ruhullah MehdiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jammu and Kashmir News : संसदेमध्ये दोन तृतियांश मताधिक्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काँटे की टक्कर सुरू असतानाच इंडिया आघाडीला झटका बसला आहे. आघाडीचा एक खासदार कमी झाला आहे. आघाडीतील प्रमुख पक्ष आणि जम्मू-काश्मीमध्ये सत्ता असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार आगा सैय्यद रुहुल्लाह मेहदी यांनी पक्षाला रामराम ठोकण्यासह खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा मंगळवारी केली.

नॅशनल कॉन्फरन्ससाठी मेहदी यांची ही घोषणा मोठा झटका मानला जात आहे. ते २०२४ च्या निवडणुकीत श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. मंगळवारी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सभेतच ही घोषणा करत मेहदी यांनी खळबळ उडवून दिली.

मागील काही दिवसांपासून मेहदी हे पक्षाच्या भूमिकेवर नाराज होते. त्याबाबत त्यांनी उघडपणे भाष्य केले होते. तर पक्षातील जवळपास दोन डझन आमदारांनी उघडपणे बंडाचे निशाण फडकावले आहे. या आमदारांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वालाच थेट आव्हान दिल्याचे मानले जात आहे.

Aga Syed Ruhullah Mehdi
Amit Shah news : अमित शहांचा 2029 साठी 'त्या' पर्यायावर 82 दिवसांनंतरही विचार सुरू! विरोधकांना धडकी...

एकीकडे आमदारांची नाराजी आणि दुसरीकडे खासदाराच्या राजीनाम्यामुळे पुढील काळात जम्मू आणि काश्मीरमधील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. मेहदी यांनी सत्ताधारी पक्षातून बाहेर पडल्यानंतर कोणती राजकीय भूमिका घेणार, याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, या राजकीय घडामोडींकडे भाजप बारकाईने लक्ष ठेऊन असल्याची चर्चा आहे.

Aga Syed Ruhullah Mehdi
Maharashtra drought news : अजिबात काळजी करू नका..! पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिला शब्द...

पक्षाने निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांबाबत सत्तेत आल्यानंतर पाठ फिरविल्याचा आरोप मेहदी यांनी केला आहे. प्रामुख्याने राज्यात पुन्हा कलम ३७० लागू करण्याच्या मुद्द्यावर ते आग्रही भूमिका मांडत आहेत. मात्र, सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्याचप्रमाणे राजकीय कैद्यांची सुटका, आरक्षण व्यवस्थेत सुधारणा, राज्याच्या घटनात्मक अधिकारांची सुरक्षा आदी मुद्दयांवरूनही ते सातत्याने सरकारला घेरत होते. त्यावरून पक्षाध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी त्यांना थेट राजीनामा देण्याबाबत आव्हान दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.