Nilesh Lanke  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke Letter to PM Modi : ...अन् अहमदनगर'LCB'च्या कारभाराचा चिठ्ठा खासदार लंकेंनी थेट मोदी अन् शाह यांनाच पत्राद्वारे धाडला!

Nilesh Lanke On Ahmednagar Police : नीलेश लंके आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अहमदनगर पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या गैरकारभाराविरोधातील आंदोलनाचा बुधवारी तिसरा दिवस होता.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या गैरकारभाराचा चिठ्ठा खासदार नीलेश लंके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पाठवला. मोदी आणि शाह यांना खासदार लंके यांनी तसे पत्र धाडले आहे. राज्यातील यंत्रणांनी दखल न घेतल्याने खासदार लंकेंनी थेट पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना थेट पत्र पाठवलं आहे. तसेच 'राज्यसरकार भरोसा लायक नाही', असा टोला नीलेश लंके यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे खासदार नीलेश लंके आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे अहमदनगर पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या भ्रष्ट कारभाराविरोधातील आंदोलनाचा बुधवारी तिसरा दिवस होता.

स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचारी कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची त्यांची मागणी आहे. या शाखेत ठाण मांडून बसलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी. तसेच या शाखेत असलेल्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपत्तीची खुली चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी राज्य आणि केंद्र सरकारकडे केली आहे.

खासदार नीलेश लंके यांनी पत्रात नगर जिल्ह्यातील पोलिसांच्या (Police) भ्रष्ट आणि अनियंत्रीत प्रशासनासंदर्भात दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी केली. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे 11 जुलैला यासंदर्भात पत्र खासदार लंके यांनी पाठवले आहे. मात्र या पत्रावर कोणाकडून देखील प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे खासदार लंके यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी देखील राज्य सरकारकडून आणि पोलिस दलातील वरिष्ठांकडून कोणतीच ठोस कृती झाली नाही.

अहमदनगर पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या भ्रष्ट कारभारावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय खासदार नीलेश लंके(Nilesh Lanke) आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी घेतला आहे. आंदोलनस्थळी जिल्ह्याभरातील नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत आहे. या तक्रारी जमा करून राज्य आणि केंद्राकडे पाठवल्या जाणार असल्याचा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला.

महिला देखील आंदोलनात सहभागी होत आहे. नीलेश लंके यांच्या आई आज आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. याशिवाय शिवसेनेचे दिवंगत उपनेते माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांच्या पत्नी शशिकला या देखील आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला. तसेच माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या भ्रष्ट कारभाराविषयी राज्य सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे आश्वासन दिले. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT