Nilesh Lanke, Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke News : लोकसभेसाठी नीलेश लंकेंना आमदारकीवर पाणी सोडावे लागणार?

Sampat Devgire

Ahmednagar News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke News) तुतारी फुंकणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यासाठी कायदेशीर बाबींची तपासणीदेखील करण्यात आली आहे. त्यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदार सुजय विखे पाटील यांना लंके आव्हान देतील, हे स्पष्ट झाले आहे. आमदार नीलेश लंके सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आहेत.

नीलेश लंकेंनी (Nilesh Lanke) एक महिना आधीच नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभेची तयारी सुरू केली होती. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा झाली. लंके यांच्या प्रवेश आणि उमेदवारीवर यापूर्वीच निर्णय झाल्याचे कळते. मात्र, कायदेशीर बाबींमुळे तो निर्णय लांबला होता.

पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी 13 मार्चला नाशिकचा दौरा केला होता. या दौऱ्यातच आमदार नीलेश लंके यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत निर्णय होणार होता. त्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली. त्यातील कायदेशीर बाबींचा अभ्यास करून निर्णय देण्याची जबाबदारी नाशिकच्या वकिलांवर सोपविण्यात आली होती. त्याबाबत एकमत न झाल्याने नाशिकमध्ये आमदार नीलेश लंके यांच्याबाबतचा निर्णय होऊ शकला नव्हता, असे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर दक्षिण लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. विखे यांची यंत्रणादेखील कार्यरत झाली आहे. या पार्श्वभूमीवर विखे यांचे विरोधक एकत्र येण्याची शक्यता आहे. या सर्व यंत्रणेचा लाभ आमदार लंके यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राजकारण चांगलेच तापले आहे.

आमदारकीवर पाणी सोडणार?

आमदार नीलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर विजयी झाले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे होते. मात्र, काही दिवसांपूर्वी पक्षात फूट पडली, त्यात अजित पवार (Ajit Pawar) गट स्वतंत्र झाला. त्याबाबत निवडणूक आयोगाने मूळ पक्ष अजित पवार यांचा असल्याचा निकाल दिला होता. त्यामुळे आता लंके यांना लोकसभा उमेदवारी करताना पक्षांतरबंदी कायद्याचा अडसर दूर करण्यासाठी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ॲड. भगीरथ शिंदे यांनी दिली.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT