Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke Oath : करून दाखवलं..! इंग्रजीत शपथ घेतल्यानंतर नीलेश लंकेंची पहिली प्रतिक्रिया

Nilesh Lanke first reaction on English oath : लोकांनी निवडून दिल्याने माझ्या डोक्यावर मोठे कर्ज आहे. त्यामुळे लोकांची कामे करून त्यांना रिजल्ट द्यायची ही वेळ आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : देशाच्या 18 व्या लोकसभेच्या ससंदेचे अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनात देशभरातील खासदारांचा शपथविधी पार पडला. राज्यातील अनेक नेत्यांनी मराठीत शपथ घेतली. तर काहींनी हिंदी भाषेत घेतली.

यात नीलेश लंके यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी थेट इंग्रजीतून शपथ घेत सर्वांना आश्चर्यांचा धक्का दिला. यावर बोलताना त्यांनी, जे ठरवले होते तेच करून दाखवले, असे सांगितले.

नीलेश लंके Nilesh Lanke म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारात शिक्षणावरून मला ट्रोल करण्यात आले. संसदेत इंग्रजीत बोलावे लागते, असे म्हणत हिणवले. त्यावर मीही मला शेतकऱ्यांची भाषा येते, असे तोडीसतोड उत्तर दिले होते. तो मुद्दा चांगलाच गाजला होता. निवडून आल्यानंतर मी संसदेत जाईन तेव्हा पहिल्यांदा इंग्रजीतच बोलेन, असे ठरवले होते. त्यानुसार आज इंग्रजीत शपथ घेतली, असेही स्पष्ट केले.

लंकेंनी इंग्रजीत शपथ घेतल्यानंतर विखेंना Sujay Vikhe Patil जोरदार प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे. त्यावर लंकेंनी मात्र तो विषय सोडून दिल्याचे म्हटले. मी ठरवल्याप्रमाणे इंग्रजीत शपथ घेतली, ती कुणालाही उत्तर देण्यासाठी नाही. आता तो विषय सोडून जोमाने कामाला लागायचे आहे. लोकांनी निवडून दिल्याने माझ्या डोक्यावर मोठे कर्ज आहे. त्यामुळे लोकांची कामे करून त्यांना रिजल्ट द्यायची ही वेळ आहे.

इंग्रजीतील शपथेच्या तयारीवर नीलश लंकेंनी सांगितले, कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही. त्यामुळे तयारी केली असली तरी त्यात अवघड असे काही नव्हते. पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतो. माझेही शिक्षण असल्याने इंग्रजीत शपथ घेण्याचे ठरवले होते. त्यातून ती घेऊन टाकली.

दरम्यान, नीलेश लंकेंचे ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar आणि खासदार अमोल कोल्हे यांनी कौतुक केले आहे. शरद पवार, संसदेत सर्व भाषेत बोलता येते. तेथे भाषांतराची सोय आहे. जन माणसांत काम करणाऱ्या व्यक्तिला तिच्या भाषेवरून बोलणे हे शहाणपणाचं लक्षण नाही. त्याचे नीलेशने उत्तर दिले याचा आम्हाला आनंद आहे, असे म्हणाले. तर जिंकलस भावा, असे म्हणत कोल्हेंनी लंकेंची पाठच थोपटली.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT