Nilesh Lanke Parner Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke Parner Election : खासदार लंकेंना दिल्लीत करमेना! कुणाची तरी जिरवायची होती, म्हणून लोकसभा लढली; आता '2029'ला मुंबईची तयारी!

NCP Sharad Pawar faction MP Nilesh Lanke announces his candidacy from Parner constituency for the upcoming Assembly elections : शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार नीलेश लंके यांनी आगामी विधानसभा निवडणूक पारनेरमधून लढण्याची घोषणा केली आहे.

Pradeep Pendhare

Parner political news : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांना दिल्लीत करमेनासे झाले आहे. त्यांना पुन्हा मुंबई खुणऊ लागली आहे. आगामी विधानसभा 2029 पारनेरमधून लढवण्याची त्यांनी आज घोषणा केली आहे.

नीलेश लंके यांच्या या घोषणेमुळे अहिल्यानगरसह राज्याच्या, विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात खळबळ उडाली आहे.

शरद पवार राष्ट्रवादीचे (NCP) खासदार नीलेश लंके यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक, ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्याचा झंझावाती दौरा सुरू केला आहे. यातूनच त्यांनी थेट निवडणूक रणधुमाळीचा बिगुल फुंकला. पारनेरमधील ढवळपुरी आणि टाकळी ढोकेश्वर गटात बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी आगामी राजकीय भूमिकेवर संवाद साधला.

खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले, “कुणाची तरी जिरवायची होती म्हणून, मी लोकसभा निवडणूक लढविली; मात्र आता येणारी विधानसभा निवडणूक मी स्वतः लढणार आहे. 2029मध्ये मुंबईतून राज्याच्या सक्रिय राजकारणात सहभागी होणार आहे."

राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी अजित पवार राष्ट्रवादीला पसंती दिली होती. परंतु विखे पाटील पिता-पुत्रांबरोबर खासदार लंकेंचा संघर्ष लोकसभेपूर्वी चांगलाच शिगेला पोहोचला आणि त्यातून शरद पवार यांनी लंकेंना हेरत, लोकसभेची उमेदवारी दिली. नीलेश लंके यांनी देखील करिष्मा दाखवत सुजय विखे पाटील यांचा पराभव केला.

नीलेश लंके खासदार झाले असले, तरी विखे पाटील पिता-पुत्रांबरोबर राजकीय संघर्ष अजून सुरूच आहे. नीलेश लंके दिल्लीत गेले. विधानसभा निवडणुकीत मात्र, त्यांच्या हातातून पारनेर विधानसभा निसटला. अजित पवार राष्ट्रवादीचे काशिनाथ दाते तिथं निवडून आले.

राणी लंकेंचा पराभव

या निवडणुकीत नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना शरद पवार राष्ट्रवादीकडून थेट उमेदवारी मिळाली होती. पण त्यांना तिथं पराभवाचा सामना करावा लागला. पण आता नीलेश लंके यांनी पारनेरमधून पुन्हा मुंबईसह राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याची घोषणा केल्याने खळबळ उडाली आहे.

संघर्षाची तयारी ठेवा

खासदार लंकेंनी पारनेर मतदारसंघ काबीज करण्यासाठी कार्यकर्त्यांसमोर आक्रमक भूमिका मांडली. “ज्या ठिकाणी अन्याय होईल, तिथे संघर्ष करा, धाक निर्माण करा आणि गरज पडल्यास आंदोलन करा. निवडणुका संपल्यानंतर कोणी कोणाला विचारत नाही. त्यामुळे गावोगाव संघटित होऊन जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करा,” असे आवाहन केले.

85 ग्रामपंचायती ताब्यात घेण्याचा निर्धार

कार्यकर्ता हा रेसच्या घोड्यासारखा असला पाहिजे. मी आजही 20-20 तास काम करतो,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना अधिक जोमाने कामाला लागण्याचे निर्देश दिले. आगामी निवडणुकांसाठी लक्ष्य निश्चित करताना त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच किमान 85 ग्रामपंचायती ताब्यात घेण्याचा निर्धार खासदार लंकेंनी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांना मरगळ झटकावी

विधानसभा निवडणुकीतील पराभवावर बोलताना, कार्यकर्त्यांना मरगळ झटकण्याचे आवाहन केले. झाले गेले गंगेला मिळाले. नकारात्मक विचार सोडून सकारात्मकतेने कामाला लागा. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे खासदार लंके यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT