Ajit Pawar & Nitin Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar News : अजित पवारांसाठी शनिवारी कळवणला शक्तिप्रदर्शन !

Nitin Pawar will demonstrate political strength in Kalwan-आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार नितीन पवार यांचा शेतकरी मेळावा

Sampat Devgire

Ajit Pawar News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर आमदार नितीन पवार आपल्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन करीत आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होणार आहे. (NCP MLA Nitin pawar have arrange a farmers public meeting)

उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या उपस्थितीत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP आमदार नितीन पवार Nitin Pawar यांच्या मतदारसंघात 494 कोटींच्या विविध कांमाचे भूमिपूजन करणार आहेत.

गेल्या चार वर्षांत कळवण- सुरगाणा विधानसभा मतदारसंघात अकराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचा दावा आमदार पवार यांनी केला. त्यामुळे विविध विकासकामे प्रगतिपथावर आहेत. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आमदार पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम होणार आहे.

या वेळी 494 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण शनिवारी (ता.७) सकाळी दहाला होत असल्याची माहिती मिळाली आहे. या वेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, पालकमंत्री दादा भुसे, खासदार सुनील तटकरे यांसह जिल्ह्यातील विविध आमदार उपस्थित राहतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT