Malegaon News : गटारीच्या निविदेत पुन्हा भ्रष्टाचाराची दुर्गंधी!

AIMIM warns agitaion against Malegaon Commissioner-मालेगाव शहरात ‘एमआयएम’च्या पदाधिकाऱ्यांचा महापालिका आयुक्तांविरोधात हल्लाबोल
Aimim leaders at Malegaon
Aimim leaders at MalegaonSarkarnama

Malegaon News : शहरात गेले काही दिवस भुयारी गटारीच्या निविदेतील गैरव्यवहारावरून वादळ उठले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत आयुक्तांविरोधात शासनाकडे तक्रार केली. आता ‘एमआयएम’ने बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे या शहरात भुयारी गटारीतील गैरव्यवहाराची दुर्गंधी सामान्यांच्या नाकाला झोंबू लागली आहे. AIMIM complains against Malegaon commissioner for sewer Tender

मालेगाव Malegaon शहरात सध्या भुयारी गटार योजनेतील गैरव्यवहाराच्या Corruption दुर्गंधीवरून राजकीय पक्षांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यात आता ‘एमआयएम’ने AIMIM उडी घेतली आहे.

Aimim leaders at Malegaon
NDCC Bank News : ३४७ कोटींच्या घोटाळ्यात न्यायालयाने सहकारमंत्र्यांचे कान टोचले!

शहरातील भुयारी गटारीची निविदा उघडण्यास होणारा विलंब संशयास्पद आहे. आगामी काळात शहरातील सर्व राजकीय, सामाजिक, पक्ष एकत्रित करून सर्वपक्षीय मिळून ‘आयुक्त हटाव, मालेगाव शहर बचाव’ ही मोहीम राबविणार आहेत.

यापूर्वी माजी आमदार रशीद शेख, आसिफ शेख या पिता-पुत्रांनी आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. कॉंग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज बेग यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांविरोधात आंदोलन करण्यात आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस पाठोपाठ एमआयएमनेही आयुक्तांना टिकेचे लक्ष्य केले आहे.

महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक सुमारे ६०० कोटीचे आहे. पूर्व भागात कामे देताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप ‘एमआयएम’ पक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते फैजुल्लाह अन्सारी यांनी केला.

‘एमआयएम’ने आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. ‘मालेगाव शहरात आयुक्त कामे करताना भेदभाव कऱतात. गेल्या तीन वर्षापासून आयुक्त ठराविक तीन ठेकेदारांनाच काम देत आहे. दुसऱ्या ठेकेदारांना काम का दिले जात नाही.? प्रभाग एकमध्ये जादा कामे मंजूर केली आहेत, असा आरोप त्यांनी केला.

Aimim leaders at Malegaon
Manoj Jarange News : मी राजकारणात जाणार नाही, ती आपली वाट नाही; मनोज जरांगे पाटलांची भूमिका

शहरात कामाचा दर्जा चांगला नसतो. शहरात गेल्या दोन महिन्यांपासून भुयारी गटारीची निविदा भरण्यात आली. अद्यापही निविदा उघडली नाही. दहा दिवसांपूर्वी निविदा उघडावी, यासाठी आयुक्तांना आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले होते.

येत्या आठवड्यात निविदा न उघडल्यास, कामातील दुजाभाव दूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. माजी नगरसेवक गिरीश बोरसे, अन्सारी मोहम्मद हुसैन, अतर हुसैन अश्रफी, सलमान अन्सारी, साजीद अन्सारी, शहबाज अन्सारी आदी उपस्थित होते.

Aimim leaders at Malegaon
Karad NCP News : बाळासाहेब पाटलांनी जिंकली न्यायालयीन लढाई; ६२ कोटींच्या कामांवरील स्थगिती उठली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com