Pankaja Munde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pankaja Munde : मराठ्यांना पाठिंबा अन् ओबीसींनाही दुखावलं नाही; पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : मराठा समाजाला न्याय देणार असे राज्य सरकार म्हणते. मात्र, मराठा समाजाला राज्य सरकार न्याय कसा देणार, याची मला उत्सुकता आहे. मी याकडे उत्सुकतेने पाहते. एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी, असा टोलाही भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी लगावला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या लाखो बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. सध्या नवी मुंबईतील वाशी येथे थांबलेल्या जरांगे आणि मराठा समाजाबरोबर राज्य सरकार वाटाघाटी करीत आहेत. कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आलेल्या पंकजा मुंडेंनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावर मोठे विधान केले.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, वाशीमध्ये नक्की काय सुरू आहे, याची मला सध्या कल्पना नाही. मात्र जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मराठा आरक्षणासंबंधी त्यांची मागणी आहे. मराठा समाजाला घटनात्मकदृष्ट्या टिकेल असे आरक्षण मिळणे आवश्यकच आहे. अन्यथा समाजाची घोर फसवणूक होऊ शकते. मराठा समाजाच्या मागणीला सरकार प्रतिसाद देते. समाजाला आरक्षण देणार असे सरकार म्हणते. पण हे आरक्षण नेमके कसे देणार, याची उत्सुकता आहे. एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी सरकारला घ्यावी लागणार आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मराठा समाजापाठोपाठ (Maratha Reservation) ओबीसी संघटनांनी मुंबई गाठण्याचा पर्याय निवडला आहे. ही बाब घातक आहे. सरकार सक्षम असून, त्यातून ते मार्ग काढतील, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. मात्र एका वंचिताला मदत करताना दुसऱ्या वंचितला दुखावता कामा नये. दोन्ही समाजामध्ये सामंजस्य टिकेल, याकडे सरकारने लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. दरम्यान, सरकार यावर तोडगा कसा काढणार, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, यावर भाष्य करण्यासाठी मी कोणत्याही रोलमध्ये नाही. त्यामुळे घटनात्मकदृष्ट्या टिकेल असे आरक्षण सरकारने द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT