Shivsena UBT : फ्लेक्स पडलेला पाहिला अन् कार्यकर्ता जागा झाला; नेमकं काय घडलं ?

Jayant Dinde : शिवसैनिकांसाठी पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे महत्त्वाचे
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : शिवसेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सगळेच कार्यक्रम आटोपून मुंबईकडे रवाना होणार होते. त्यांची दोन दिवसांची धावपळ संपणार होती. पक्षप्रमुखांना निरोप देण्यासाठी अनेक पदाधिकारी हजर झाले होते. दुपारच्यावेळी ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना झाले तर, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख जयंत दिंडेंनी घराची वाट पकडली धरली. मात्र, तेथून अगदी जवळच पक्षाचा एक भलामोठा फ्लेक्स आडवा झालेला त्यांना दिसला. मग काय, पद, प्रतिष्ठा बाजूला सारून दिंडेंनी लागलीच आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन तो फ्लेक्स पुन्हा उभा केला. आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

याबाबत दिंडे म्हणाले, 'पक्ष प्रमुख ठाकरे (Uddhav Thackeray) हॉटेलमधून मुंबईच्या दिशेने गेले. यानंतर आम्ही हॉटेलपासून रस्त्याने पायी निघालो. तेथे एक फ्लेक्स बोर्ड रस्त्यावर आडवा झालेला दिसला. सहाजिकच तो बोर्ड पक्ष प्रमुखांच्या स्वागतासाठी लागलेला होता. त्यामुळे मी काही कार्यकर्त्यांना घेऊन तो पडलेला बोर्ड सरळ केला. हा व्हिडीओ दूरून कोणतरी शूट करून सोशल मीडियावर टाकला. वास्तविक सदर व्यक्तीने मला विचारले असते तर मी त्यास नकार दिला असता. असो, आपण कार्यकर्ता आहोत, हे प्रत्येक शिवसैनिकाने लक्षात ठेवायला हवे,' असाही सल्ला त्यांनी शिवसैनिकांना दिला.

Uddhav Thackeray
Maratha Vs OBC : मराठा कुणबीवरून 'या' नेत्यांनं मांडला महत्त्वाचा मुद्दा; ओबीसी नेत्यांनांही फटकारलं

'बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचेही दिंडेंनी सांगितले. ते म्हणाले, त्या बोर्डवर कोणत्या पदाधिकाऱ्यांचे, कोणत्या गटाच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत, हे मी पाहिले नाही. माझ्यासाठी पक्षाची इभ्रत मोठी आहे. बोर्डावर माझ्या पक्षाच्या प्रमुखांचा फोटो आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे, हे कारण पुढाकार घेण्यासाठी मला पुरेसे आहे,' असाही खुलासा त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'मी सरळ निघून गेलो असतो तर तसा फरक पडला नाही. पण माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांवर देखील कानाडोळा करण्याचे संस्कार झाले असते. राजकीय पद प्रतिष्ठा मोठी झाली की कार्यकर्ता बाजूला होतो आणि पक्षाचे नुकसान होते. याउलट शिवसेना कार्यकर्ते घडवते. संपर्क प्रमुख वा इतर कोणेतही पद मोठे मानून पक्षाचे नुकसान होताना पाहणे, यासारखे मोठे पाप नाही,' याकडेही जयंत दिंडेंनी (Jayant Dinde) लक्ष वेधले.

Uddhav Thackeray
Ajit Pawar Vs Rohit Pawar : अजितदादांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, 'आमचीही चौकशी झाली, मात्र...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com