Maratha Vs OBC : मराठा कुणबीवरून 'या' नेत्यांनं मांडला महत्त्वाचा मुद्दा; ओबीसी नेत्यांनांही फटकारलं

Haribhau Rathod : मराठ्यांना कुणबी आरक्षण म्हणजे बारा बलुतेदारांच्या ताटात वाटेकरी
Maratha Vs OBC
Maratha Vs OBCSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. त्यानुसार सरकारच्या वतीने समिती नेमून नोंदी तपासणीचे काम हाती घेतली. यातून आतापर्यंत ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यातील ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र दिल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात येते. आता या ५७ लाख लोकांच्या सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्यात यावे, यावर जरांगे पाटील ठाम आहेत. यावरून माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मराठा-कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले.

ओबीसीत अनेक लहान जाती आहेत. आता मात्र सरकारची कुणबी प्रमाणपत्र देण्याची लगबग सुरू आहे. कुणबी प्रमाणपत्र दिले तर ते सर्व ओबीसी वर्गात आपोआप येणार आहे. यातच ५७ लाख नोंदी आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांना आरक्षण दिले तर ओबीसीतील लहान जातींच्या ताटातील आरक्षण ओरबडले जाणार आहे, असा दावा (Haribhau Rathod) राठोडांनी केला.

Maratha Vs OBC
Ajit Pawar Vs Rohit Pawar : अजितदादांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, 'आमचीही चौकशी झाली, मात्र...'

हरिभाऊ राठोड म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते की, ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देऊ. परंतु आता उघड झाले आहे की, ओबीसीच्या १९ टक्के आरक्षणामध्ये करोडच्या संख्येने मराठा समाज येणार आहे. ते ओबीसींचे संपूर्ण आरक्षण फस्त करतील. हे टाळण्यासाठी मराठ्यांना ओबीसीचे उप-वर्गीकरण करून आरक्षण देण्याची मागणी करत होतो. तसे केले असते तर मूळ ओबीसींतील छोट्या जातीचे आरक्षण सुरक्षित राहिले असते, या मुद्द्याकडे राठोडांनी लक्ष वेधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओबीसींच्या आरक्षणावर आलेल्या गंडांतराला सरकारच जबाबदार असल्याचा घणाघातही राठोडांनी केला. ते म्हणाले, राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या या सर्व प्रकरणास जितके सरकार जबाबदार आहे, तितकेच ओबीसी नेतेही जबाबदार आहेत. आम्ही सरकारसह ओबीसी नेत्यांचाही धिक्कार करतो, अशी टीका करत माजी खासदार हरिभाऊ राठोडांनी शासानासह ओबीसी नेत्यांचा निषेध केला.

(Edited by Sunil Dhumal)

Maratha Vs OBC
Lok Sabha Election 2024 : ‘खासदार चांगले काम करीत आहेत..‘ गावित कोणाबाबत म्हणाले असं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com