Nagar, 4 May : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपच्या चारशे पार नाऱ्याची खिल्ली उडवली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रश्नावर ‘नो कमेंट्स’ एवढीच प्रतिक्रिया दिली. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेवरून देखील मिश्किल टोला लगावला आहे. राज ठाकरे यांनी महायुतीसाठी मुंबईत पण सभा घ्याव्यात, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नगर दक्षिण लोकसभा उमेदवाराच्या प्रचारासाठी आज (ता. 4 मे) नगरमध्ये (Nagar) सभा घेतली. या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. सभेनंतर त्यांनी माध्यमांशी घाईघाईत संवाद साधला. या संवादामध्ये त्यांनी भाजपच्या चारशे पार नाऱ्याची खिल्ली उडवली. तसेच, महायुतीमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेविषयीही टिपण्णी केली. याशिवाय राज्यात भाजपचे उमेदवार विकास कामांऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव पुढे करून मते मागत आहे, यावर देखील टिपण्णी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपचे उमेदवार आता मोदींच्या नावे मते मागत आहेत, या प्रश्नावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एका वाक्यात उत्तर दिले. आंबेडकर म्हणाले, ‘नो कमेंट्स’. देशात भाजपने अबकी बार चारशे पार, असा नारा दिला आहे. या नाऱ्याची खिल्ली प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उडवली. ‘भाजप देशात दोनशे पार देखील करणार नाहीत, अशी आजची स्थिती आहे’, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यानुसार राज ठाकरे यांच्या सभा भाजपकडून महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी घेतल्या जात आहेत. तसे नियोजन केले गेले आहे. या सभांबाबत प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना मिश्किल टोला लगावला. ‘राज ठाकरे यांनी मुंबईत पण सभा घ्याव्यात’, असा उपरोधिक टोला वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.